एलन मस्क यांनी घेतला Twitter चा ताबा, सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करून ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरसोबत जी डील होती त्याचा वाद सुरू होता. सुरूवातीला ४४ अब्ज डॉलर्सची ऑफर देत एलन मस्क ट्विटर खरेदी करणार असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र यातून त्यांनी काढता पाय घेतला आणि ही डील फिस्कटली होती. त्यानंतर ट्विटरने न्यायालयात धाव घेतली. ज्यामुळे ट्विटर खरेदी करणं किंवा कारवाईला सामोरं जाणं हे दोनच पर्याय मस्क यांच्यापुढे उरले होते. पण, या करारामुळे पराग अग्रवाल यांना सीईओ पदावरून पायउतार व्हावं लागलं.

ADVERTISEMENT

शुक्रवारपर्यंतचा अवधी एलन मस्क यांना दिला गेला

शुक्रवारपर्यंत ट्विटर खरेदी करा किंवा कारवाईला सामोरे जा असा अल्टिमेटम मस्क यांना देण्यात आला होता. त्यानंतर मस्क यांनी काही गुंतवणूकदारांना सोबत घेत ही डील पूर्ण केली आहे. ट्विटरचे मालक झाल्यानंतर पराग अग्रवाल यांची हकालपट्टी मस्क यांनी केली आहे.

पराग अग्रवाल यांच्यासह तिघांची हकालपट्टी

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार एलन मस्क यांनी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल, पॉलिसी हेड विजया गड्डे आणि चीफ फायनांसियल ऑफिसर नेड सेगल यांना काढून टाकलं आहे. ट्विटरने अद्याप या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यास आणि बोलण्यास नकार दिला आहे. मात्र एलन मस्क यांच्या या पावलामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मस्क यांनी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल असं म्हटल्याच्याही चर्चा होत्या. मात्र नंतर मस्क यांनीच याबाबत स्पष्टीकरण देत असा निर्णय घेणार नसल्याचं म्हटलं होतं.

हे वाचलं का?

कोण आहेत पराग अग्रवाल?

जगभरात लोकप्रिय असलेल्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी एका भारतीय व्यक्तीवर सोपवण्यात आली होती. पराग अग्रवाल यांच्याकडे जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर सीईओ पदाची सूत्रं देण्यात आली. आयआयटी बॉम्बेतून शिक्षण घेतलेल्या पराग अग्रवाल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांच्या हकालपट्टीच्या बातम्या समोर आल्या आहेत.

पराग अग्रवाल यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मोठे झाले. आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवीचं (Graduation) शिक्षण घेतलं आहे.

ADVERTISEMENT

त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ‘कम्प्युटर सायन्स’ (computer science) पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून बढती देण्यात आली. 2017 मध्ये ट्विटरने पराग अग्रवाल यांना मुख्य टेक्निकल अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं.

ADVERTISEMENT

ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असताना पराग अग्रवाल यांनी सुरूवातीला ट्विटरचे यूजर्स, महसूल व मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टेक्निकल स्ट्रेटजी व सुपरव्हिजन विभागांचे मुख्य अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. ट्विटरमध्ये रुजू होण्यापूर्वी पराग अग्रवाल यांनी AT&T, Microsoft आणि Yahoo या कंपन्यांमध्ये संशोधन इंटर्नशिप केलेली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT