महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयात, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे असं आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले तर त्यावर चर्चा झालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहचले आहेत असाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. TET […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे असं आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले तर त्यावर चर्चा झालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहचले आहेत असाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.
TET Exam scam : पात्र उमेदवारांच्या यादीत घुसवली 500 नावे; असा करण्यात आला घोटाळा…
न्यासा नावाची एक कंपनी आहे, या कंपनीला 21 जानेवारी 2021 ला या अपात्र ठरवलं. त्यानंतर ही कंपनी कोर्टात गेली. ज्यानंतर 4 मार्च 2021 ला याच कंपनीला पात्र ठरवण्यात आलं. हायकोर्टाच्या आदेशाने पात्र केलं असं उत्तर दिलं जाईल. पण माझा प्रश्न असा आहे की त्यांनाच काम देण्याची आवश्यकता काय होती ? न्याासाशिवाय इतर कंपन्या नव्हत्या का?
न्यासाला परीक्षांचं काम दिल्यानंतर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या भरतीत घोटाळा झाला. त्यानंतर म्हाडाच्या भरतीत घोटाळा झाला. GA सॉफ्टवेअरलाही एप्रिलमध्ये अपात्र ठरवलं गेलं. आता TET घोटाळा झाला आहे. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात हे घोटाळे या ठिकाणी चाललेत. 25 आणि 26 सप्टेंबरला 6 हजारांहून अधिक पदांसाठी परीक्षा घेतली. न्यासाने या परीक्षेत पेपर फोडण्यापासून पुढच्या अनेक गोष्टी केल्या.