Medical Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सरकारने परीक्षेबाबत केली ‘ही’ घोषणा
लातूर: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (Maharashtra University of Health Sciences) येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात […]
ADVERTISEMENT

लातूर: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (Maharashtra University of Health Sciences) येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. अशी माहिती देखील अमित देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी परीक्षा घेणं योग्य नसल्याने आता राज्य सरकारने ही देखील परीक्षा पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) April 15, 2021
‘या परीक्षा पुढे ढकलणेबाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे’, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.