आर्यन खानने अनन्याकडून अरेंज केला गांजा, मित्रांना दाखवली NCB ची भीती? नवे What’s App चॅट समोर
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे तेव्हापासून ड्रग्ज प्रकरणाची आणि बॉलिवूडची चर्चा चांगलीच होते आहे. कॉर्डिलिया शिपवर ही पार्टी होणार होती. मात्र एनसीबीने ही पार्टी उधळून लावली. हे सगळं प्रकरण रोज वेगळी वळणं घेतं आहे. अशात आता आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातले नवे चॅट्स समोर आले आहेत. त्यावरून असं दिसतं […]
ADVERTISEMENT
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे तेव्हापासून ड्रग्ज प्रकरणाची आणि बॉलिवूडची चर्चा चांगलीच होते आहे. कॉर्डिलिया शिपवर ही पार्टी होणार होती. मात्र एनसीबीने ही पार्टी उधळून लावली. हे सगळं प्रकरण रोज वेगळी वळणं घेतं आहे. अशात आता आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातले नवे चॅट्स समोर आले आहेत. त्यावरून असं दिसतं आहे की आर्यनला अनन्याने गांजा पुरवला. एवढंच नाही तर या चॅटमध्ये एनसीबीचाही उल्लेख झाला आहे.
ADVERTISEMENT
आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातले काही धक्कादायक चॅट्स समोर आले आहेत. या स्क्रिनशॉट्समध्ये असं दिसतं आहे की आर्यन खानला कोकेन टुमारोचा प्रस्ताव दिला असल्याचं दिसून येतं आहे. एका चॅटमध्ये एनसीबीच्या नावाने मित्रांना भीतीही दाखवण्यात आली आहे. Whats App चॅटमध्ये आर्यन खान एका अचित कुमारकडून 80 हजारांचं ड्रग्ज (Weed) मागवलं होतं. असंही समोर आलं आहे.
हे वाचलं का?
काय आहे समोर आलेलं चॅट ? हे चॅट जुलै 2019 मधलं आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान हे दोघे या चॅटमध्ये ड्रग्जवर चर्चा करत आहेत. वाचा काय आहे हे चॅट.
आर्यन खान- मी तुझ्याकडून गुपचुप ड्रग्ज घेईन
ADVERTISEMENT
अनन्या पांडे-ठीक आहे
ADVERTISEMENT
आर्यन-Weed
अनन्या-हे डिमांडमध्ये आहे
आर्यन- मी ते सिक्रेटली तुमच्याकडून घेईन
अनन्या-ठीक आहे
याच दिवशी आर्यन खान आणि अनन्या पांडे यांचा दुसरा चॅट
अनन्या-मी या बिझनेसमध्ये आहे..
आर्यन-तू वीड आणलं आहेस का?
अनन्या-हो मला मिळतं आहे
NCB ला या दोघांचं चॅट 18 एप्रिल 2021चं लेटेस्ट चॅटही मिळालं आहे. या चॅटमध्ये आर्यन खान आपल्या मित्रांशी कोकेनबाबत चर्चा करत आहेत.
आर्यन-उद्या कोके घेऊ..
आर्यन-मी तुमच्यासाठी घेऊन य़ेतो आहे..
आर्यन – By NCB
आर्यन खानच्या फोनमध्ये जे व्हॉट्स अॅप चॅट आहेत त्यामध्ये इतर दोन जणांसोबत तो बोलतो आहे. एनसीबीकडे अनन्या पांडे आणि आर्यन खान यांची सगळी चॅट्स आहेत. यामध्ये ड्रग्जविषयीची चर्चा आहे. एवढंच नाही तर इतर स्टार किड्स सोबतही चर्चा झाल्याचं एनसीबीने म्हटलं आहे. हे तीन स्टार किड्स कोण आहेत हे मात्र अद्याप कळलेलं नाही.
आर्यन खानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढल्या आहेत. त्याला अटक करण्यात आल्यापासून आत्तापर्यंत चारदा जामीन मिळावा म्हणून सुनावणी झाली आहे. तरीही त्याला जामीन मिळू शकलेला नाही. आता त्याला जामीन मिळणार की नाही हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT