नागपूरसह विदर्भात अतिउष्णतेची लाट, एप्रिलच्या सुरवातीला 45 अंशावर जाणार पारा
-योगेश पांडे, नागपूर एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. नागपूरसह विदर्भात अक्षरशः सूर्य तळपायला सुरुवात झाल्याने मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.विदर्भात पुढील काही दिवसांत तापमानात आणखी […]
ADVERTISEMENT

-योगेश पांडे, नागपूर
एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. नागपूरसह विदर्भात अक्षरशः सूर्य तळपायला सुरुवात झाल्याने मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.विदर्भात पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याची माहिती हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केवळ नागपूर आणि विदर्भातचं नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा वर चढलेला दिसून येत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान हे चाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे.