प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते (Actor) आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Passed Away) यांचे निधन झाले आहे. त्यांचे जवळचे मित्र आणि (Anupam Kher) अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून या दुःखद बातमीची माहिती दिली. त्यांनी लिहिले की मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे हे मला माहीत आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र (Friend) सतीश कौशिक बद्दल असे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते.

ADVERTISEMENT

अनुपम खेर यांनी लिहिले की, ४५ वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम मिळाला. सतीश Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहताना अनुपम खेर यांनी लिहिले की, सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखी राहणार नाही.

हे वाचलं का?

मिस्टर इंडिया चित्रपटापासून मिळाली होती ओळख

सतीश कौशिक हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1965 रोजी हरियाणामध्ये झाला. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी त्यांनी थिएटरमध्ये काम केले. एक चित्रपट अभिनेता म्हणून सतीश कौशिक यांना 1987 च्या मिस्टर इंडिया चित्रपटाच्या कॅलेंडर नावाच्या रोलमधून ओळख मिळाली. यानंतर त्यांनी 1997 मध्ये आलेल्या दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजरची भूमिका साकारली होती. सतीश कौशिक यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये साजन चले ससुरालसाठी सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

काश्मीर फाईल्स ‘व्हल्गर’ आहे म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांनी सुनावलं, म्हणाले… “काही लोक… “

ADVERTISEMENT

दिल्लीतून शालेय शिक्षण

सतीश कौशिक यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोरी माल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. 1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1985 मध्ये त्यांनी शशी कौशिकसोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मुलाचे वयाच्या 2 व्या वर्षी निधन झाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT