मराठमोळ्या पद्धतीने होणार फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं लग्न, खंडाळ्यात रंगणार सोहळा
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक प्रसिद्ध जोड्या विवाहबंधनात अडकत आहेत. अशाच एका जोडीची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार सुरु आहे. चंदेरी दुनियेतील आणखी जोडी विवाहबंधनात अडकत आहेत. बॉविवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर शनिवारी लगीनगाठ बांधत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन रिती-रिवाजानुसार हा विवाह पार पडणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर […]
ADVERTISEMENT
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक प्रसिद्ध जोड्या विवाहबंधनात अडकत आहेत. अशाच एका जोडीची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार सुरु आहे. चंदेरी दुनियेतील आणखी जोडी विवाहबंधनात अडकत आहेत. बॉविवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर शनिवारी लगीनगाठ बांधत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन रिती-रिवाजानुसार हा विवाह पार पडणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर फरहानच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर सात फेरे घेत साताजन्माची गाठ बांधणार आहेत.
या विवाह सोहळ्यात फरहान आणि शिबानी यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत. फरहान अख्तरची आई हनी ईरानी यांनी ही माहिती दिली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
फरहान आणि शिबानी गेल्या चार वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. यानंतर त्यांनी आपले नाते अधिकच घट्ट करण्यासाठी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या आधीच्या रिती-रिवाजांना सुरुवात झाली असून गुरुवारी शिबानीच्या वांद्रे स्थित घरामध्ये मेहंदी सेरेमनी पार पडली. या सेरेमनीमध्ये जवळच्या मित्र परिवाराला आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी घरीच सर्व तयारी करण्यात आली होती. शबाना आझमी,अमृता अरोरा याही मेहंदी सेरमनी मध्ये सहभागी झाल्या होत्या.
ADVERTISEMENT
लग्नाची तयारीही जोरदार करण्यात आली असून 19 फेब्रुवारी रोजी बहुचर्चित विवाह संपन्न होईल. हा विवाह खासगी पद्धतीने पार पडणार आहे. मीडियाने विवाहाला उपस्थित राहून फोटो काढू नये म्हणून हा विवाहाबाबत अधिक माहिती देत नसल्याचे हनी ईरानी यांनी स्पष्ट केले. लग्नासाठी आज फरहान आणि शिबानीचे कुटुंबीय खंडाळ्याच्या फार्महाऊसवर विवाहस्थळी दाखल होतील. 19 फेब्रुवारी रोजी पारंपरिक विवाह पार पडल्यानंतर 21 फेब्रुवारी सिविल सेरेमनीमध्ये लग्न होईल.
ADVERTISEMENT
फरहान आणि शिबानीची ओळख एका रिअॅलिटी शो दरम्यान झाली होती. 2015 मध्ये ‘I Can Do That’ हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरु होता. या शो मध्ये फरहान होस्ट होता तर शिबानी कंटेस्टंट होती. या शो दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी आपल्या रिलेशीपवर शिक्कामोर्तब केला. सोशल मीडियावरही दोघांचे एकत्र फोटो शेअर करु लागले. फरहानचे हे दुसरे लग्न आहे. अधुना भबानीसोबत 16 वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये आपल्या वैवाहिक आयु्ष्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर फरहानने मुव्ह ऑन करत शिबानीसोबत नाते जोडले.
ADVERTISEMENT