Janhit Mein Jaari trailer : नुसरत भरूचाने नव्या सिनेमावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Janhit Mein Jaari Trailer Release : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nusharratt Bharuccha) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे. यावेळीही कारण आहे तिने निवडलेला चित्रपट. जनहित में जारी नावाचा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा सिनेमा १० जूनला प्रदर्शित होणार आहे.

काय आहे सिनेमाची गोष्ट?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नुसरत भरूचा ची या सिनेमात मध्यवर्ती भूमिका आहे. जनहित में जारी सिनेमात तिने अशा मुलीचा रोल केला आहे जी कंडोम विकण्याचं काम करते. आर्थिक तंगीमुळे स्वीकारलेली ही नोकरी नंतर तिला आवडू लागते. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी ती ही नोकरी कायम करण्याचा निर्णय घेते. तिचं या सिनेमातलं नाव मन्नू असं दाखवलं आहे. मन्नूच्या नोकरीला तिच्या घरातल्यांचा आणि समाजाचा विरोध असतो.

दारोदार फिरून मुलीने कंडोम विकणं हे कुणालाच आवडत नसतं. अशात तिला एक मुलगा आवडू लागतो. या दोघांचं प्रेम जमतं, धुमधडाक्यात लग्नही होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मात्र सिनेमची खरी गंमत इथूनच सुरू होते. ही मुलगी कुठे काम करते ते तिच्या पतीने घरातल्यांना सांगितलेलं नसतं. मन्नूच्या सासरच्या मंडळींना मन्नू कुठे नोकरी कळते हे कळतं आणि मग ताण-तणाव आणि वाद निर्माण होतात. लोक तिच्याविरोधात बोलू लागतात तेव्हा मन्नू आवाज उठवते. कंडोमबाबत जागरूकता का हवी? हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते. आता या संघर्षात ती यशस्वी होते का? हे पाहण्यासाठी सिनेमाच बघावा लागेल. मात्र या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे.

नुसरत झाली ट्रोल

नुसरत भरुचा या सिनेमाचं आकर्षण आहे हे हा ट्रेलर सांगतो आहे. ट्रेलरमध्ये तर ती छा गयी है असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिच्यासोबत अनुध सिंह नायकाच्या भूमिकेत आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन जय बसंतु सिंह यांनी केलं आहे. हा एक सोशल कॉमेडी ड्राम आहे. जनहित में जारी सिनेमाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. नुसरत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे यात काही शंका नाही. याआधी नुसरतने सिनेमाचा टिझर शेअर केला होता. त्यानंतर ती चांगलीच ट्रोल झाली होती.

सिनेमाच्या टिझरमध्ये नुसरतला कंडोम विकताना दाखवण्यात आल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करत तिच्या विरोधात अनेक अश्लील कमेंट केल्या. त्यांचा स्क्रिन शॉट काढत नुसरतने आणखी एक ट्विट केलं आणि मला हीच मानसिकता बदलायची आहे असं म्हणत तिने या सगळ्या ट्रोलर्सनला उत्तर दिलं आहे.

पाहा ट्रेलर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT