कल्याण : मनसेच्या शहराध्यक्षावर ४ कोटी ११ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा
–मिथिलेश गुप्ता, कल्याण खोट्या सहीच्या आधारे बँकेतून ४ कोटी ११ लाख रुपये काढून पार्टनरची फसवणूक केल्याप्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांच्यासह त्यांचा भाऊ कल्पेश देसाई असा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोघांनी तब्बल ४ कोटी ११ लाख २१ हजार ७५३ रुपयांची जमीन मालकाची […]
ADVERTISEMENT

–मिथिलेश गुप्ता, कल्याण
खोट्या सहीच्या आधारे बँकेतून ४ कोटी ११ लाख रुपये काढून पार्टनरची फसवणूक केल्याप्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांच्यासह त्यांचा भाऊ कल्पेश देसाई असा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोघांनी तब्बल ४ कोटी ११ लाख २१ हजार ७५३ रुपयांची जमीन मालकाची फसवणूक केली असल्याचा आरोप आहे.
महत्मा फुले पोलीस ठाण्यात गणेश म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, गौरीपाडा येथे वडिलोपार्जित २० गुंठे जागा विकसित करण्यासाठी कौस्तूभ देसाई यांच्यासोबत करार करण्यात आला होता. ड्रीमहोम्स या संस्थेच्या नावाखाली हा करार केला होता. पैशाच्या व्यवहारासाठी एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आल्याचं सांगितलं गेलं. त्यासाठी म्हात्रे यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतली गेली. नंतर कौस्तूभ देसाई यांनी सांगितले की, ही बँकबरोबर सेवा देत नाही म्हणून जीपी पारसिक बँकेत खाते उघडलं गेलं.
दरम्यान म्हात्रे यांनी ऑडीट केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की, त्यांची ४ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक कौस्तूभ व त्यांचा भाऊ कल्पेश देसाई यांनी केली आहे. एचडीएफसी बँकेत खाते उघडले होते, पण ते उघडले गेले नाही, असं म्हात्रे यांना खोटं सांगण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे फ्लॅट धारकांनी या बँकेत जे पैसे जमा केले होते. ते ४ कोटी ११ लाख रुपये खोट्या सहीच्या आधारे कौस्तूभ व कल्पेश् देसाई यांनी काढून फसवणूक केल्याचं म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कौस्तूभ देसाई व कल्पेश देसाई यांच्या विरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










