Mumbai fire : ताडदेवमधील इमारतीला का लागली आग?, जखमींना भरती करण्यास रुग्णालयांचा नकार
मुंबईतील ताडदेव भागात असलेल्या एका २० मजली इमारतीत भीषण आगीची घटना घडली. शनिवारी सकाळी १८व्या मजल्यावर ही घटना घडली. या घटनेत ७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, २८ लोक जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, जखमींवर उपचार सुरू असून, आगीचं प्राथमिक कारणही समोर आलं आहे. ताडदेव भागातील भाटिया रुग्णलयासमोर असलेल्या कमला बिल्डिंग या २० मजली रहिवाशी इमारतीत […]
ADVERTISEMENT
मुंबईतील ताडदेव भागात असलेल्या एका २० मजली इमारतीत भीषण आगीची घटना घडली. शनिवारी सकाळी १८व्या मजल्यावर ही घटना घडली. या घटनेत ७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, २८ लोक जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, जखमींवर उपचार सुरू असून, आगीचं प्राथमिक कारणही समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
ताडदेव भागातील भाटिया रुग्णलयासमोर असलेल्या कमला बिल्डिंग या २० मजली रहिवाशी इमारतीत शनिवारी आगीने तांडव घातलं. १८व्या मजल्यावर अचानक आग लागली आणि बघता बघता आग वाढत गेली. सकाळी ७:३० वाजता ही घटना घडली.
हे वाचलं का?
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. दरम्यान, या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल २८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
इमारतीत आगीची घटना का घडली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. आग लागण्याचं प्राथमिक कारण समोर आलं असून, इमारतीतील अग्निशमन सिस्टीम बंद असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ईलेक्ट्रिक केबलमधील वायर वितळल्याने शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला आणि संपूर्ण मजल्यावर पसरला. आगीमुळे १९०४ क्रमाकांच्या फ्लॅटमध्ये सर्वाधिक नुकसान झालं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सध्या मजल्यावर धूर पसरलेला असून, मदत आणि बचाव मोहीम अद्याप सुरू आहे.
जखमींना भरती करून घेण्यास नकार
आगीच्या घटनेतील जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तीन रुग्णालयांनी भरती करून घेण्यास नकार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणावर बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘रुग्णालयाने जखमींना भरती करून घेण्यास नकार दिला. रुग्णालयाने असं का केलं यांची चौकशी करण्यात येईल. महापालिका आयुक्तांनाही याची माहिती दिली जाईल.’
‘भाटिया रुग्णालयात एकही बेड रिक्त नसल्याने जवळच्या रुग्णालयांना बेड रिकामे ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. लोकांना इमारतीतून बाहेर काढलं जात असून, बचाव मोहीम सुरू आहे,’ असं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.
पंतप्रधानांकडून शोक; मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा
मुंबईत झालेल्या आगीच्या घटनेत ७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, या मृतांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजारांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT