Nagpur: आधी कोरोना नंतर म्युकोरमायकोसिसने गमावला डोळा, पोलीस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई तक

योगेश पांडे, नागपूर नागपूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलवरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, आत्महत्येचं कारण फारच खळबळजनक असल्याचं आता समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद मेरगुवार या पोलीस कर्मचाऱ्याला आधी कोरोनाची लागण झाली. यावर उपचार केल्यानंतर तो बरा देखील झाला. पण त्यानंतर त्याला म्युकोरमायकोसिस (Black Fungus) ची लागण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

नागपूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलवरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, आत्महत्येचं कारण फारच खळबळजनक असल्याचं आता समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद मेरगुवार या पोलीस कर्मचाऱ्याला आधी कोरोनाची लागण झाली. यावर उपचार केल्यानंतर तो बरा देखील झाला. पण त्यानंतर त्याला म्युकोरमायकोसिस (Black Fungus) ची लागण झाली होती. त्यामुळे त्याला एक डोळा देखील गमवावा लागला होता.

एक डोळा गमवल्यानंतर दुसरा डोळासुद्धा होता जवळजवळ 80 टक्के खराब झाला होता. याच सगळ्या गोष्टीमुळे त्रस्त होऊन प्रमोद याने गोळी झाडून आत्महत्या केली असावी अंदाज व्यक्त केला जातो.

हे वाचलं का?

    follow whatsapp