उज्ज्वला थिटेंच्या अर्जानंतर पंडित देशमुख हत्या प्रकरण पुन्हा का आलं चर्चेत? A टू Z स्टोरी

निलेश झालटे

निवडणूक ही संपूर्ण राज्यात चर्चेत विषय ठरली होती. पण याच निवडणुकीमुळे अनगरमधील 20 वर्षांआधी ज्या पंडित देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आलं आहे. जाणून घ्या याची A टू Z स्टोरी.

ADVERTISEMENT

why did pandit deshmukh murder case come into spotlight again after ujjwala thite application a to z story
पंडित देशमुख हत्या प्रकरण पुन्हा का आलं चर्चेत?
social share
google news

अनगर (सोलापूर): ठिकाण: मोहोळ, 5 एप्रिल 2005 चा दिवस... शिवसेनेचा उपतालुकाप्रमुख असलेल्या व्यक्तीला दुकानासमोरुन उचललं जातं. हातपाय तोडत त्याचा गळाच कापला जातो. एवढंच नाही तर त्याच्या तोंडावर लघुशंका केली जाते. या क्रूर हत्येने एकच खळबळ उडते. दंगल उसळते, अख्खं मोहोळ गाव जळतं. विधानसभेत मुद्दा गाजतो, भाजप-सेना प्रचंड आक्रमक होते. 13 आरोपी पकडले जातात. त्यात तत्कालीन आमदार पुत्राचाही समावेश असतो. दीडेक वर्षातच सगळे आरोपी बाहेर येतात. हत्या झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव पंडित कमलाकर देशमुख. तर या प्रकरणात मुख्य आरोपी होते बाळराजे राजन पाटील. आता अनगरमधील दहशत आणि राजकारणावर सातत्यानं बोललं जात आहे आणि त्यातच सतत पंडित देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणही चर्चेत येत आहे. याच गाजलेल्या प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण घेऊया.

नेमकं काय आहे 'ते' हत्या प्रकरण?

जुनीजाणती माणसं सांगतात आजही या पंडित देशमुखांच्या हत्येच्या घटनेची आठवण आली तरी भीती वाटते. राजन पाटील तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले होते. मोहोळमध्ये त्यांचं वर्चस्व त्याआधीपासूनचं. त्यात शिवसेना उपतालुकाप्रमुख पंडित देशमुख स्थानिक लेव्हलला एक्टिव्ह कार्यकर्ते. पाटलांच्या विरोधात थेट नडायचे. राजन पाटलांचे पुत्र बाळराजेंची नुकतीच राजकारणात एन्ट्री झाली होती. निवडणूक होऊन काही दिवसच झालेले, त्यात देशमुखांनी चॅलेंज केलं. काही जणांनी पंडित देशमुखांना दुकानापासून भरदिवसा उचललं. क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली.

हे ही वाचा>> आधी मुलाने नाद करु नका म्हणत अजितदादांना आव्हान दिलं, आता एका दिवसात राजन पाटील अन् बाळराजेंचा माफीनामा

राष्ट्रवादीचे आताचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या घटनेचं सतत वर्णन मीडियासमोर येऊन करताहेत. ते सांगतात, 'पंडित देशमुख यांचा मर्डर या बाळराजे पाटलानं केला. यामध्ये 13 आरोपी होते. त्यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील होते. ते राष्ट्रवादीचेच होते. आर आर आबांच्या पाया पडून माझ्या पोराला वाचवा म्हणत पाटीलकी गुंडाळून घरी ठेवत गेले होते. हाच तो बाळराजे आहे, मर्डर करणारा बाळराजे पाटील होता. शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित देशमुखचा मर्डर केला. त्यांचे हातपाय तोडले, गळा कापला, जीभ कापली, एवढंच नाही तर विकृत बाळराजे पाटलाने त्यांच्या तोंडावर लघुशंका केली', अशा शब्दात उमेश पाटलांनी भीषण आरोप केलेत जे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. 'मुंबई Tak'वरही हा व्हिडीओ आपण पाहू शकता.

तर 2005 मध्ये हत्या झाली त्यावेळी विरोधी पक्षनेते नारायण राणेंनी विधानसभेत जोरदारपण हा मुद्दा मांडला होता. स्थगन प्रस्ताव आणत या हत्येत सत्तारुढ पक्षाचे नेते सामील असल्याचा आरोप केला होता. शिवाय स्थानिक पोलिसही यात आरोपींना मदत करत असल्याचा आरोप केला होता. पोलीस निरीक्षकांच्या अटकेची मागणीही राणेंनी केलेली. त्यावेळचे सोलापूरचे आमदार नरसय्या आडम मास्तरांनी देखील हा विषय लावून धरलेला. जमावाने देशमुखांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला तेव्हा पोलीस पळून गेले असा आरोप आडम मास्तरांनी विधानसभेत केलेला. बाबासाहेब कुपेकर अध्यक्ष होते, विरोधकांच्या निशाण्यावर अर्थातच होते सत्ताधारी आमदार राजन पाटील. गोंधळ झाला, कागद भिरकावले गेले. सभागृह बंद पाडलं गेलं. मग त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री असलेल्या आर. आर. पाटलांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्याची ग्वाही दिली. उद्धव ठाकरे, मनोहर जोशींनी मोहोळमध्ये येऊन तेव्हा देशमुख कुटुंबाची भेट घेतली होती, अशा बातम्याही पेपरमध्ये दिसतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp