पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 5 जागीच ठार, 6 जण गंभीर
इंदापूर जवळून जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळीने भरलेला टँकर आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर इंदापुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री इंदापूरलगत भीमानगर परिसरात घडली. मळीने भरलेला टँकर (एमएच 14 सीपी 4020) इंदापूरकडून सोलापूरकडे निघाला […]
ADVERTISEMENT
इंदापूर जवळून जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळीने भरलेला टँकर आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर इंदापुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री इंदापूरलगत भीमानगर परिसरात घडली.
ADVERTISEMENT
मळीने भरलेला टँकर (एमएच 14 सीपी 4020) इंदापूरकडून सोलापूरकडे निघाला होता. तर सोलापूरकडून तांदूळ असलेला ट्रक (एमएच 25/4045) पुण्याकडे निघाला होता. भीमानगर येथील सरदारजी ढाब्याजवळ येताच वेगात असलेल्या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
पुणे : एकाच कुटुंबातील सहा जणांना वाहनाने चिरडले; तिघे जागीच ठार, अल्पवयीन मुलांचा समावेश
हे वाचलं का?
पुणे सोलापूर महामार्गावर भीमा नदी पुलावर इंदापूरच्या बाजूस रस्त्याचे काम चालू असल्याने भीमानगर येथे एकेरी वाहतूक करण्यात आली होती. रात्री या रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्याने सोलापूरच्या दिशेने जाणारा ट्रक-टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून टँकर डिव्हायडरला धडकला. त्यानंतर टँकर आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली.
या भयंकर अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. सहा जण गंभीर जखमी झाले असून, जखमींवर इंदापूरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची नावं अद्याप समजू शकली नाहीत.
ADVERTISEMENT
दारू पिऊन भरधाव निघाला अन् दिडींतील 25 वारकऱ्यांना चिरडलं; चौघांचा मृत्यू
ADVERTISEMENT
वाहतुकीचा खोळंबा…
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. अपघातस्थळाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती कळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीद यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळाकडे धावले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक साईडला काढून रात्री एक वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT