नागाला घेतला किस, तरुणाला महागात पडली रिस्क!
स्वाती चिखलीकर, सांगली: सांगलीतील एका स्टंटबाज तरुणाने चक्क नागाला किस केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. अर्थात वनविभागाला काही हा प्रकार रुचला नाही आणि त्यांनी या स्टंटबाज तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. खरं तर नाग पाहिला तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. पण सांगलीतील प्रदीप अडसुळे मात्र नागासोबत जीवघेणे स्टंट करत फिरतो. तो एवढ्यावरच थांबत नाही […]
ADVERTISEMENT

स्वाती चिखलीकर, सांगली: सांगलीतील एका स्टंटबाज तरुणाने चक्क नागाला किस केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. अर्थात वनविभागाला काही हा प्रकार रुचला नाही आणि त्यांनी या स्टंटबाज तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
खरं तर नाग पाहिला तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. पण सांगलीतील प्रदीप अडसुळे मात्र नागासोबत जीवघेणे स्टंट करत फिरतो. तो एवढ्यावरच थांबत नाही तर प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे सगळे या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ तयार करुन ते सोशल मीडियावर पोस्ट देखील करतो. पण आता हाच प्रकार त्याला महागात पडला आहे.
आज (29 मार्च) मौजे बावची ता. वाळवा जिल्हा सांगली येथील प्रदीप अशोक अडसुळे (वय 22 वर्ष) याने नाग पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. पण याच व्हीडिओच्या आधारे वन विभागाने त्याच्यावर कारवाई करत त्याचे वर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वन गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई विजय माने उपवनसंरक्षक सांगली, डॉ. अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा, सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर व अमोल साठे वनरक्षक बावची व निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.