Parambir Singh: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल, ‘मुंबई Tak’ सोबत बोलताना काय म्हणाले परमबीर?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे गुरुवारी (25 नोव्हेंबर) अचानक मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या वसुली प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. परमबीर सिंह हे देश सोडून पळून गेले आहेत असे अनेक दावे केले जात होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने देखील आपण कुठे आहात असा सवाल? परमबीर सिंग यांना केला होता. त्यानंतर आज अचानक परमबीर सिंग मुंबईत दाखल झाले आहेत.

ADVERTISEMENT

पाहा ‘मुंबई Tak’शी बोलताना परमबीर सिंग काय म्हणाले

‘मी इथे चौकशीसाठी आलो आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने इथे आलो असून चौकशीला मी सामोरं जाणार आहे. माझ्यावर ज्या काही केसेस टाकण्यात आल्या आहेत त्याविषयी मला इथे काहीही बोलायचं नाही, मला जे काही बोलायचं ते मी कोर्टातच बोलेन.’ असं परमबीर सिंग यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे चंदीगडमध्येच राहत होते. ‘मुंबईत आपल्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपण तिथे येऊ शकत नाही’, असे त्यांनी आपल्या वकिलांमार्फत कोर्टाला सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आणि तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. आता परमबीर सिंग तपासात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले आहेत. मुंबई Tak शी बोलताना त्याने सांगितले की, ‘मी सध्या फार काही शेअर करू शकत नाही. पण देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मला न्याय मिळेल’, अशी आशा आहे.

सध्या परमबीर सिंग यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्याच्या अटकेला स्थगिती देण्यात आली असली तरी तपास यंत्रणांना सतत सहकार्य करावे लागेल. अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

22 जुलै रोजी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आणि इतर दोघांसह पाच पोलिसांवर एका बिल्डरकडून 15 कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपानुसार, परमबीर सिंग आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमताने तक्रारदाराच्या हॉटेल आणि बारवर कारवाईचा धाक दाखवून 11.92 लाख रुपये उकळले होते.

ADVERTISEMENT

Exclusive : ‘मी चंदीगढमध्ये, लवकरच मुंबईत चौकशीसाठी हजर राहणार’; परमबीर सिंह यांचा ठिकाणा सापडला

या प्रकरणी मुंबईच्या एका कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केले होते. याशिवाय 30 दिवसांच्या आत कोर्टात हजर न राहिल्यास कायद्यानुसार त्याची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत ही कारवाई टाळण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तपासात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT