पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का! माजी मंत्री-आमदार एकनाथ शिंदे गटात जाणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आठ दिवसापासून बंड पुकारले असून त्यांच्या सोबत 51 आमदार आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. तर त्याच दरम्यान शिवसेनेच्या अनेक माजी आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा देखील आता समावेश झाला आहे.आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना.

ADVERTISEMENT

विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यांसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लढत आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत मी आहे. आता तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाहेर पडाव. तसेच आजच्या राजकीय परिस्थितीला संजय राऊत हेच जबाबदार असल्याची भूमिका मांडत, विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी विजय शिवतारे म्हणाले की, मागील 25 ते 30 वर्ष ज्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी मतदार संघाची बांधणी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत संघर्ष केला आणि आज त्याच नेत्यासोबत काम करण्याची वेळ आली आहे. दुसर्‍या बाजुला मागील अडीच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम करू दिली नाही. याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन, एकनाथ शिंदे साहेबांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचलं का?

तसेच ते पुढे म्हणाले की,आम्ही 100 टक्के बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वावर चालणारे लोक आहोत,त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा वाद नाही. उद्धव ठाकरे साहेब अतिशय सज्जन माणुस, परंतु अक्षरशः त्यांना घेरले आहे.त्या पार्श्वभूमीवर आज माझ्या पुरंदर विधानसभा मतदार संघातील दोन हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ठराव केला आहे.त्या ठरावाची प्रत उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे.

आज देखील आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, पण महाविकास आघाडी सोबत राहणार नाही. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत 51 हून अधिक आमदार सोबत आहेत.ते हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जात असून प्रामुख्याने शिवसेना आणि शिवसैनिक टिकला पाहिजे, हीच भावना एकनाथ शिंदे यांची भावना आहे. आता तरी उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्या हाकेला ओ, दिली पाहिजे.अशी माझ्यासह अनेक शिवसैनिकांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून बाहेर पडाव, अशी माझी भूमिका आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT