जालन्यात बैलाने शेतकऱ्याला एका दिवसात 11 लाखांचा मालक बनवलं, 'बिजल्या'ने शंकरपटात घोड्याला नमवलं
Bull made a farmer the owner of 11 lakhs in a day : बैलाने शेतकऱ्याला एका दिवसात 11 लाखांचा मालक बनवलं, 'बिजल्या'ने शंकरपटात घोड्याला घाम फोडला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बैलाने शेतकऱ्याला एका दिवसात 11 लाखांचा मालक बनवलं
'बिजल्या'ने शंकरपटात घोड्याला घाम फोडला
Bull made a farmer the owner of 11 lakhs in a day, जालना : मंठा तालुक्यातील कानफोडी गावातील शेतकरी पवन राठोड यांनी आपल्या मेहनती आणि प्राणीप्रेमाच्या जोरावर मोठा पराक्रम केलाय. त्यांनी संभाळलेल्या आणि प्रशिक्षित केलेल्या 'बिजल्या' नावाच्या बैलाने त्यांना एका दिवसात 11 लाखांचा बनवलं. सांगली जिल्ह्यातील सागर कटरे यांनी हा बैल तब्बल 11 लाख 11 हजार रुपयांना विकत घेतला असून, या व्यवहाराने परिसरात चर्चेचा विषय निर्माण केला आहे. कारण बिजल्याने शंकरपटातील शर्यतीत घोड्यांनाही पाणी पाजलंय. अनेक शर्यतीत त्याने नाव कमावलं होतं.
मेहनत आणि काळजीतून तयार झाला ‘बिजल्या’
पवन राठोड यांनी तमिळनाडूहून अवघ्या 51 हजार रुपयांत 10 महिन्यांच्या ‘बिजल्या’ला खरेदी केले होते. सुरुवातीपासूनच त्यांनी त्याला खास प्रशिक्षण आणि पौष्टिक आहार देण्यावर भर दिला. रोज 3 लिटर दूध, 100 ग्रॅम बदाम, 1 किलो उडीद डाळ, तसेच सायंकाळी मका आणि गहू भरडा असा आहार दिला जात असे. दर दोन दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ घालून त्याची काळजी घेतली जाई. या सातत्यपूर्ण निगा आणि प्रशिक्षणामुळे ‘बिजल्या’ची ताकद, चपळता आणि आकर्षक ठेवण पाहून सर्वजण थक्क झाले.
शंकरपटातील स्टार बैल
‘बिजल्या’ हा शंकरपटातील धावपटू बैल असून, त्याने जालना, वाशिम, जिंतूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 30 पैकी 25 शर्यतींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या शर्यतींमधून त्याने 3 ते 4 लाख रुपयांपर्यंतची कमाई केली. घोड्यांनाही मागे टाकणाऱ्या वेगाने धावणारा हा बैल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. दररोज सकाळी 7 वाजता ‘बिजल्या’ला 2 किलोमीटर चालवून वर्कआऊट करवले जात असे, त्यामुळे त्याची फिटनेस कायम राखली गेली.










