माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोलेंचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे आज (25 एप्रिल) पुण्यात निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचं प्राथमिक वृत्त समजतं आहे.

ADVERTISEMENT

त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा, सून दक्षिणा, जावई महेश आणि नातवंडे आदिती, मनन, गायत्री आणि तारिणी असा मोठा परिवार आहे.

पुढील काही तासांत माधव गोडबोले यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबाने विनंती केली आहे की, ही पूर्णपणे खाजगी बाब आहे आणि प्रत्येकजण त्याचा आदर करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार अतिशय कमी लोकांमध्ये पार पाडण्यात येईल.

हे वाचलं का?

बाबरी मशीद विध्वंसानंतर माधव गोडबोलेंनी दिला होता राजीनामा

1991 साली केंद्रीय नगरविकास खात्याच्या सचिव पदाचा कार्यभार असेलल्या डॉ. माधव गोडबोले यांची याच साली केंद्रीय गृहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सलग दोन वर्ष ते या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कायम होते. मात्र, 6 डिसेंबर 1992 रोजी एका प्रचंड मोठा जमावाने बाबरी मशीद पूर्णपणे पाडून टाकली होती.

ADVERTISEMENT

भारतीय राजकारणाची दशा आणि दिशा बदलवून टाकणारी ही घटना माधव गोडबोले यांच्या गृह सचिवपदाच्या कार्यकाळातच घडली होती. या घटनेनंतर देशातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या. या सगळ्या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्या अपयश आल्याचं खापर हे माधव गोडबोले यांच्या माथी फोडण्यात आलं होतं. याच सगळ्या आरोपप्रत्यारोपांना त्रस्त होऊन अखेर 23 मार्च 1993 रोजी माधव गोडबोले यांनी आपला राजीनामा देत स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.

ADVERTISEMENT

भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त होण्यासाठी जवळजवळ दीड वर्षांचा कालवधी शिल्लक असतानाही माधव गोडबोले यांनी झालेल्या एकूण प्रकारेमुळे निवृत्ती घेतली होती.

डॉ. माधव गोडबोले यांचा अल्पपरिचय

डॉ. माधव गोडबोले यांचा जन्म 15 ऑगस्ट, 1936 रोजी झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रातून M.A आणि पीएच.डी. केली होती. तसेच अमेरिकेतील विल्यम्स कॉलेज मधून त्यांनी मास, यूएसएमधून विकास अर्थशास्त्रात एम.ए. ची पदवी घेतली होती. 1959 साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती.

भारतीय प्रशासकीय सेवेतील एक कर्तबगार अधिकारी अशी त्यांची ओळख होती. केंद्रीय गृह सचिव असताना त्यांनी मार्च 1993 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यापूर्वी ते पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे सचिव होते.

तसेच आधी ते भारत सरकारचे नगरविकास सचिव आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारचे प्रधान वित्त सचिव होते. तसेच मनिला येथील आशियाई विकास बँकेत त्यांनी पाच वर्षे काम केले होते.

डॉ. गोडबोले यांनी सार्वजनिक धोरण आणि इतर विषयांवर तब्बल 22 पुस्तकं लिहिली होती त्यातील 13 इंग्रजीत आहेत. त्यांची शेवटची चार पुस्तके द गॉड हू फेल्ड: अॅन असेसमेंट ऑफ जवाहरलाल नेहरू लीडरशिप (2014), गुड गव्हर्नन्स नेव्हर ऑन इंडियाज रडार (2014), सेक्युलॅरिझम: इंडिया अॅट अ क्रॉसरोड्स (2016), आणि इंदिरा गांधी-एन एरा ऑफ कॉन्स्टिट्यूशनल डिक्टेटरशिप. (2018). ही आहे.

‘अयोध्येतल्या राम मंदिरासाठी शिवसैनिकांचं योगदान’ म्हणत मिलिंद नार्वेकरांनी पोस्ट केला बाबरी मशिदीचा फोटो

माधव गोडबोले यांची अनेक पुस्तके मराठीत अनुवादित झाली आहेत. अग्रगण्य वर्तमानपत्रे, नियतकालिके यासाठी त्यांनी इंग्रजी आणि मराठीत 450 हून अधिक लेख लिहिले आहेत. लोकसत्ता या मराठी दैनिकात त्यांनी दोन वर्षे साप्ताहिक स्तंभलेखन देखील केले होते. त्यांच्या मराठी पुस्तकांना कथाबाह्य, बौद्धिक लेखनासाठी सहा पारितोषिके देखील मिळाली आहेत. डॉ. गोडबोले हे एन्रॉन ऊर्जा प्रकल्पासह विविध सरकारी समित्यांचे अध्यक्षही होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT