टेन्शन कायम! महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दिवसभरात आणखी चार रूग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आणखी चार रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं ओमिक्रॉनच्याबाबतीतलं टेन्शन कायम आहे. महाराष्ट्रातल्या ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या रूग्णांची संख्या आता 32 झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आठ रूग्ण आढळले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या 28 झाली होती. आता ती 20 वर पोहचली आहे.

ADVERTISEMENT

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रचंड झपाट्याने पसरतो आहे-WHO प्रमुख

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे चार रूग्ण आढळले आहेत त्यातले दोन रूग्ण उस्मानाबाद येथील, एक रूग्ण मुंबई येथील आणि एक रूग्ण बुलढाणा येथील आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 2 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण नात्याने पिता पुत्र असून उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील आहेत. 43 वर्षीय व्यक्ती परदेश दुसऱ्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आली होती मात्र त्यांचा 16 वर्षीय मुलाचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र त्या मुलाचा ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह मात्र ओमिक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने विशेष काळजी घ्यावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मुल्ला यांनी केले आहे.

हे वाचलं का?

ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या या दोन्ही रूग्णांची प्रकृती स्थिर असुन 43 वर्षीय व्यक्तीला माईल्ड म्हणजे सौम्य लक्षणे आहेत तर 16 वर्षीय मुलाला लक्षणे नाहीत. कोरोनाचे हे बदलते स्वरूप आगामी काळात डोकेदुखी ठरणार असून विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णाबरोबरच ओमीक्रॉन रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे डॉ मुल्ला यांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत राज्यात एकूण 32 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. (मुंबई – 13, पिंपरी चिंचवड -10, पुणे मनपा -2, उस्मानाबाद-2, कल्याण डोंबिवली-1 नागपूर-1, लातूर -1 वसई विरार-1 आणि बुलढाणा-1). यापैकी 25 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

Omicron : हाच ट्रेंड दुसरी लाट येण्यापूर्वी दिसला; ‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा

आज ओमिक्रॉन बाधित आढळलेल्या चार रुग्णांची सर्वसाधारण माहिती –

हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत.

या चार रुग्णांपैकी एक स्त्री तर तीन पुरुष

वयोगट-16 वर्षे ते 67 वर्षे

लक्षणे- सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत

प्राथमिक माहितीनुसार उस्मनाबाद य़ेथील एका रुग्णाने शारजा प्रवास केला आहे. दुसरा रुग्ण त्याचा निकटसहवासित आहे.

बुलढाणा य़ेथील रुग्णाने दुबई प्रवास केला आहे. मुंबईतील एक व्यक्तीने आयर्लंड प्रवास केला आहे.

या पैकी तीन रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एक रुग्ण लसीकरणास पात्र नाही

सर्व रुग्ण रुग्णालयात विलगीकरणात आहेत.

या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT