गडचिरोली : नक्षलींनी जमिनीत पुरुन ठेवलेली १६ लाखांची रक्कम जप्त
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हालेवरा जंगल परिसरात पोलिसांच्या नक्षलविरोधी चळवळीला मोठं यश मिळालं आहे. नक्षलींनी जंगलातील जमिनीत पुरुन ठेवलेली १६ लाखांची रक्कम, स्फोटकं आणि डिटोनेटर पोलिसांच्या हाती लागलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना इकडे दोन हजारांच्या नवीन नोटांचं बंडल सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात काम करणारे कंत्राटदार आणि तेंदुपत्ता व्यवसायिकांकडून नक्षली सातत्याने […]
ADVERTISEMENT
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हालेवरा जंगल परिसरात पोलिसांच्या नक्षलविरोधी चळवळीला मोठं यश मिळालं आहे. नक्षलींनी जंगलातील जमिनीत पुरुन ठेवलेली १६ लाखांची रक्कम, स्फोटकं आणि डिटोनेटर पोलिसांच्या हाती लागलं आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना इकडे दोन हजारांच्या नवीन नोटांचं बंडल सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात काम करणारे कंत्राटदार आणि तेंदुपत्ता व्यवसायिकांकडून नक्षली सातत्याने खंडणी वसूल करत असतात. हे पैसे आणि स्फोटकांचा देशविरोधी कारवायांसाठी वापर केला जातो. त्यामुळे गडचिरोलीत पोलीस पथकाला हे मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT