Kalyan : गांधारी पूल वाहतुकीसाठी सुरक्षीत, २० तासांनी पूल वाहनचालकांसाठी खुला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. तब्बल २० तासांनी हा पूल खुला करण्यात आला. पुलाच्या खांबाला कोणतेही तडे गेले नसल्याचे तसेच हा उड्डाणपूल सुस्थितीत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याने या पुलावरील वाहतूक सुरू केल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक यांनी दिली.

ADVERTISEMENT

हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गांधारी पुलाच्या खांबाला तडे गेल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे काल रात्री १० वाजल्यापासून इथली वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज दुपारी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पुलाला कोणतेही तडे गेलेले नसून पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या काळ्या कापडाने सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले.

PWD च्या अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर आज संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा खुला करण्यात आल्याची माहिती ट्रॅफिक एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली. तसेच वाहतुक बंद करण्यासाठी घालण्यात आलेले बॅरिकेट्सही तातडीने बाजूला करण्यात आले.

हे वाचलं का?

गांधारी पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असून नागरिकांनी त्याचा वापर करण्याचे आवाहनही वाहतुक पोलिसांनी केले आहे. दरम्यान हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्याने पुला पलीकडे राहणाऱ्या गावातील हजारो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पूल बंद असल्याने अनेकांना भिवंडीमार्गे लांबचा वळसा घालून ये-जा करावी लागली. मात्र पूल सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT