गिरीश महाजन यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवारांना पुन्हा डिवचलं, एका रात्रीत…
जळगाव: राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा डिवचलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता किती आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. गेल्या काळात आपण काय काय पराक्रम केलेत हे पण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेची चिंता करू नका. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना तुम्ही विचार केला पाहिजे, […]
ADVERTISEMENT
जळगाव: राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा डिवचलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता किती आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. गेल्या काळात आपण काय काय पराक्रम केलेत हे पण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेची चिंता करू नका.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना तुम्ही विचार केला पाहिजे, त्यांच्या बरोबर आपण एका रात्रीत उपमुख्यमंत्री व्हायला तयार होता, आता त्यांच्यात तुम्हाला काय वावगं वाटतंय? असा सवाल गिरीष महाजन यांनी विचारला आहे. आज गिरीश महाजन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गिरीश महाजन अजित पवारांवर चांगलेच भडकले…
अजित पवार म्हणाले होते की मी माझ्या आईला भेटायला जात असतो पण त्यावेळी माझ्यासोबत फोटोग्राफर नसतो. आईला भेटायला जाण्यासाठी मोदी कॅमेरामन सोबत घेऊन जातात अशा शब्दात अजित पवारांनी मोदींवर टीका केली होती, त्यावर आता गिरीश महाजनांनी उत्तर दिलं आहे. मोदी आणि त्यांचा परिवार काय आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे, असं असतांना तुम्हाला काय संभ्रम पडला आहे. तुमच्या मनातच काहीतरी काळ गोरं आहे. तुमच्या परिवारातले लोक कुठं अडकले आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
पालकमंत्र्यांच्या नावावरुन अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना टोला
पालकमंत्र्यांच्या नावावरुन अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. अजित पवार म्हणाले होते की, मी एकाच जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही गुदमरायचो. आता फडणवीसांनी सहा जिल्ह्यांचा ताबा घेतला आहे त्या जिल्ह्यांचे काय होईल माहीत नाही. पवार म्हणाले की, या सरकारने सत्तेवर येऊन प्रदीर्घ दिवसांनी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस यांना जनतेची कामे करायची आहेत, त्यामुळे त्यांना माझ्या शुभेच्छा.
देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांचा पलटवार
अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाच-सहा जिल्ह्यांची जबाबदारी एकाच वेळी कशी पार पाडली जाते. लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे. त्याचा गुरुमंत्र मी त्यांना नक्कीच देईन.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT