औरंगाबाद : विकृत चालकाने ‘तो’ प्रश्न विचारताच तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसईतल्या श्रद्धा पालकर हत्याकांडांची चर्चा राज्यभर सुरू असताना औरंगाबादमध्ये संतापजनक घटना समोर आलीये. ट्यूशन संपल्यानंतर घरी जात असलेल्या तरुणीला भरधाव रिक्षातून उडी मारावी लागली. रिक्षाचालकांने तरुणीला अश्लील प्रश्न विचारत वेगात रिक्षा पळवल्यानं ही घटना घडली. यात तरुणी जखमी झाली असून, आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केलीये.

ADVERTISEMENT

औरंगाबादेत तरुणीची भरधाव रिक्षातून उडी, काय घडलं?

पीडित तरुणी औरंगाबादमधील एका महाविद्यालयात बारावी वर्गात शिकते. ती नीट परीक्षेचीही तयारी करतेय. ‘नीट’चा क्लास संपल्यानंतर तिने शहरातील उस्मानपुरा भागातील गोपाल टी पॉईंटपासून एक रिक्षा पकडली.

रिक्षातून घरी जात असताना ती एकटीच असल्याचं पाहून रिक्षाचालक तिच्याशी बोलू लागला. शिक्षण आणि तिच्या कुटुंबियांविषयी त्याने चौकशी केली. रिक्षा चालक वडिलांच्या वयाचा असल्यानं तिने सुरुवातीला काही प्रश्नांची उत्तरं दिली.

हे वाचलं का?

भयंकर! आईने पकडून ठेवलं अन्…; धडावेगळं केलेलं शीर घेऊन भाऊ लोकांना म्हणाला ‘पाहा, हिचं काय केलं’

थोड्या वेळाने विकृत रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लील बोलण्यास सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार ‘तुला सोबत फिरायला आवडेल का?’ असा प्रश्न त्याने पीडित तरुणीला केला. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. चालक रिक्षाचा वेगही वाढवत होता.

ADVERTISEMENT

त्यानंतर त्याने रिक्षा सिल्लेखाना चौकातून खोकडपुऱ्याच्या दिशेने वळवला. नंतर ‘तुला सेक्स करायला आवडेल का?’ असा प्रश्न विचारत त्याने रिक्षाचा वेग वाढवला. त्यामुळे काहीतरी विपरीत घडण्याचा संशय येताच तरुणीने जिवाची पर्वा न करता धावत्या रिक्षातून उडी मारली. औरंगाबाद शहरातील सिल्लेखाना चौकात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली.

ADVERTISEMENT

Shraddha Murder : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे लपवले फ्रीजमध्ये, गर्लफ्रेंडला घेऊन आला घरी; आफताबने काय सांगितलं?

औरंगाबाद : तरुणीचा गेला असता जीव….

वाहनांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावरच ही घटना घडली. पीडित तरुणीने ज्यावेळी रिक्षातून उडी घेतली. त्यावेळी रिक्षाच्या मागे एक भरधाव कार होती. तरुणीने डाव्या बाजूने उडी घेतल्यानं ती रस्त्याच्या कडेला पडली. यावेळी कार चालकानंही कार थांबवली. दुसरं वाहनं असतं तर तरुणीला जीवही गमाववा लागला असता.

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

तरुणीने रिक्षातून उडी घेतल्यानंतर रिक्षाचालक सरळ पुढे निघून गेला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षाची माहिती घेतली. आरोपी सय्यद अकबर सय्यद हमीद (वय ३९) पडेगाव भागात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला घरी जाऊन ताब्यात घेतलं. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT