Thane crime : ‘लिव्ह-इन’चा क्रूर शेवट! प्रेयसीला बोलावून घेतलं अन्…
Man killed live-in partner in Thane : प्रेयसीला फिरण्याच्या बहाण्याने कसाऱ्याच्या जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी संपवल्याची धक्कादायक आणि शहारे आणणारी घटना समोर आलीये. ठाणे जिल्ह्यातील कसाराच्या जंगलात तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत तपासाची चक्र फिरवून आरोपींचा छडा लावला आणि बेड्या ठोकल्या. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसाराच्या जंगलात 5 जानेवारी रोजी 20 ते 25 […]
ADVERTISEMENT
Man killed live-in partner in Thane : प्रेयसीला फिरण्याच्या बहाण्याने कसाऱ्याच्या जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी संपवल्याची धक्कादायक आणि शहारे आणणारी घटना समोर आलीये. ठाणे जिल्ह्यातील कसाराच्या जंगलात तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत तपासाची चक्र फिरवून आरोपींचा छडा लावला आणि बेड्या ठोकल्या.
ADVERTISEMENT
मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसाराच्या जंगलात 5 जानेवारी रोजी 20 ते 25 तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आलं. हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता.
मृतदेह आढळून आल्यानंतर कसारा पोलिसांनी 24 तासांतच हत्येच्या घटनेचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी भिंवडीतील दोन तरुणांना अटक केलीये.
हे वाचलं का?
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सहा पैकी 3 आरोपीही Minor
तरुणीची लिव्ह इन पार्टनरकडून हत्या… पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?
कसाऱ्याच्या जंगलात मृतदेह सापडलेल्या तरुणीजवळ पोलिसांना मोबाईल मिळाला. हा फोन मृत तरुणीचाच होता. मोबाईल लॉक होता. त्यामुळे पोलिसांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली. 5 जानेवारी रोजीच मोबाईलचा लॉक उघडण्यात यश आलं. त्यामुळे पोलिसांना तरुणीची ओळख पटवण्यात मदत झाली.
ADVERTISEMENT
तरुणीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात मृत तरुणी मोटारसायकलवरून दोन तरुणांसोबत जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी 4 शोध पथक तयार केली.
ADVERTISEMENT
Palghar Gangrape case : मित्रावर विश्वास ठेवला अन् झाला घात, 8 नराधमांनी रात्रभर…
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलवर असलेल्या कॉल डिटेल्स, लोकेशनच्या आधारावर पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. पोलिसांच्या एका टीमने भिवंडीत जाऊन आरोपी रिझवान आणि त्याचा मित्र अर्शदला अटक केली.
तरुणीची हत्या का केली? आरोपी रिझवानने पोलीस चौकशीत काय सांगितलं?
आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यात आरोपींनी घटनेबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिझवान हा मृत तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. मागील वर्षभरापासून दोघं भिवंडीत राहत होते.
गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून भांडणं होत होते. त्यामुळे रिझवानने रिलेशनशिपमधून सुटका करून घेण्यासाठी त्याने मित्र अर्शदसोबत कट रचला.
Nashik Crime: खून केला, अपघाताचा बनाव रचला; बोगस पत्नीही आणली; पण…
रिझवानने मयत तरुणीला फिरण्यासाठी जायचं आहे म्हणून बोलावून घेतलं आणि तिला कसाराच्या जंगलात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे तरुणी जागेवरच मरण पावली. यावेळी तरुणीजवळ मोबाईल होता, मात्र आरोपींचं लक्ष मोबाईलकडे गेलंच नाही. मात्र, मोबाईलने पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT