तीन पर्याय देत अमृता फडणवीस यांचं ट्विट, नेटकऱ्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ट्विटर तसंच सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. आज त्यांनी केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्याचाही संदर्भ त्यांनी या ठिकाणी घेतला आहे तसंच नेटकऱ्यांना तीन ऑप्शन दिले आहेत आणि त्यातला एक पर्याय निवडायला सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट केलंय ज्यामध्ये त्या म्हणतात…

रिक्त स्थान भरे… आज मै……………………… असं म्हणत रिकामी ओळ सोडली आहे आणि तीन पर्याय दिले आहेत

हे वाचलं का?

१) corona positive पाई गयी हूं

२) एक दुख भरा प्रेमगीत लिख रही हूं

ADVERTISEMENT

३) बरसातसे पहले #mumbai की सडकोंका मुआईना करने का प्लान रही हूँ सही जवाब चुनने वालोको मिलेगा Like असं म्हणत त्यांनी ही पोस्ट केली आहे.

ADVERTISEMENT

अमृता फडणवीस यांचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. #mondaythoughts #MondayVibes #MondayMotivaton हे हॅशटॅगही त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या ट्विटवर रिप्लायचा पाऊस पडला आहे. कोरोना पॉझिटिव्ह पायी गयी हूँ हा पर्याय अनेकांनी निवडला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ते सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. मुंबईत कोरोना रूग्णांची संख्याही रोज वाढताना दिसते आहे त्यामुळे हा पर्याय अनेकांनी निवडला आहे असं दिसतं आहे.

तर बरसातसे पहले #mumbai की सडकोंका मुआईना करने का प्लान रही हूँ हा पर्यायही अनेक नेटकऱ्यांनी निवडला आहे. याआधीही अमृता फडणवीस यांनी पावसाळ्याच्या आधी मुंबईतल्या रस्त्यांचा आढावा घेतला होता. त्यानंतर ट्विट करून महाविकास आघाडीला लक्ष्यही केलं होतं. या पार्श्वभूमीवर अनेकांना वाटतं आहे की अमृता फडणवीस यांच्या प्रश्नाचा पर्याय म्हणजे हेच उत्तर असेल.

अमृता फडणवीस यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलला का लावली आहे हजेरी? कारण आलं समोर…

काहींनी गंमत म्हणून तिन्ही पर्याय निवडले आहेत. तर काहींनी रिप्लाय देत दुसरा पर्याय नका निवडू असं आर्जव अमृता फडणवीस यांना केलं आहे. अमृता यांनी सोशल मीडियावर मंडे मोटिव्हेशन म्हणतं ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी “आज मी__________”, असं म्हणत लोकांना पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. या ट्विटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT