गौरवास्पद! Global Teacher डिसले गुरूजींना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर
ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना तंत्रज्ञानातील विविध अभिनव प्रयोगांमुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे. बार्शी येथील शिक्षक असलेले रणजीत सिंह डिसले यांना ग्लोबल टिचर म्हणून गौरवण्यात आलं आहे. आता त्यांना डॉ. एपीजे अब्दुल कालम प्राईड ऑफ इंडिया या पुरस्कारने गौरवलं जाणार आहे. ग्लोबल […]
ADVERTISEMENT
ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना तंत्रज्ञानातील विविध अभिनव प्रयोगांमुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे. बार्शी येथील शिक्षक असलेले रणजीत सिंह डिसले यांना ग्लोबल टिचर म्हणून गौरवण्यात आलं आहे. आता त्यांना डॉ. एपीजे अब्दुल कालम प्राईड ऑफ इंडिया या पुरस्कारने गौरवलं जाणार आहे.
ADVERTISEMENT
ग्लोबल टिचर रणजीतसिंह डिसले गुरूजींच्या शिरेपचात मानाचा तुरा
डिसले गुरूजींच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला असून डिसले गुरूजींवर सोलापूर या त्यांच्या जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षावर होतो आहे. डिसलेगुरूजींनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
रणजीतसिंह डिसले यांचं ट्विट नेमकं काय आहे?
खरं तर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय.
हे वाचलं का?
या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित. हे ट्विट हा पुरस्कार जाहीर झाल्यावर रणजीतसिंह डिसले यांनी केलं आहे.
खरं तर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय.
या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित . pic.twitter.com/Z0MSIYFvKY— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) July 25, 2022
२७ जुलैला रामेश्वरम येथे पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. डिसले गुरूजींना त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येईल. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतो आहे, जबाबदारी वाढली आहे असं डिसले गुरूजींनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत डिसले गुरूजी?
डिसले गुरूजी हे ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते आहेत. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.
ADVERTISEMENT
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार विजेते आहेत
सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना सात कोटी रूपयांचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या संदर्भातली घोषणा केली होती
पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचं रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे
या रकमेतून नऊ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं जाईल असा त्यांचा मानस आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT