रशिया युक्रेन युद्धानंतर जळगावात वाढला सोन्याचा भाव, प्रति तोळा 51 हजारांच्याही पुढे

मुंबई तक

युक्रेन रशिया युद्ध सुरू होताच सोन्याच्या भावात उसळी पहायला मिळाली. सकाळी सराफा बाजार उघडला आणि काही वेळातच युद्धालाही सुरवात झाल्याने सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम मागे 51 हजार 800 रुपयांवर पोहचला आहे. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअर बाजार तसेच मुंबई शेअर बाजार खाली आला आहे तर भारतीय रुपयाही 50 पैश्यांची स्वस्त झाला आणि सोन्याचे भाव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

युक्रेन रशिया युद्ध सुरू होताच सोन्याच्या भावात उसळी पहायला मिळाली. सकाळी सराफा बाजार उघडला आणि काही वेळातच युद्धालाही सुरवात झाल्याने सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम मागे 51 हजार 800 रुपयांवर पोहचला आहे. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअर बाजार तसेच मुंबई शेअर बाजार खाली आला आहे तर भारतीय रुपयाही 50 पैश्यांची स्वस्त झाला आणि सोन्याचे भाव वाढत उच्चांकी गाठली आहे.

सोन्याचे 55 हजार पर्यंत पोहोचतील – जाणकारांच मत

युद्ध असेच सुरू राहील तर 24 कॅरेट सोन्याचे प्रति तोळा भाव 55 हजारांपर्यंत जाईल असा आंदाज व्यक्त जळगाव सराफ असोशियशनचे सचिव तसेच सोने भावाचे जाणकार स्वरूपकुमार लुंकड यांनी व्यक्त केला आहे.मात्र युद्ध संपताच हा भाव त्याच वेगाने खालीही येतील असंही मत व्यक्त केल आहे.यामुळे सोन्याची खरेदी किंवा इन्व्हेंस्ट करतांना ग्राहकांनी काळजी घ्यावी असा सल्लाही लुंकड यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp