भयंकर.. अर्धनग्न अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न
व्यंकटेश दुडमवार, गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याअंतर्गत कुंभारटोलीलगत जंगल परिसर आहे. या परिसरात एका पंधरा ते सोळा वयोगटातील तरुणीचा आज (21 एप्रिल) सकाळी मृतदेह आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा चेहरा जाळून तिची ओळख मिटविण्याचा प्रयत्न मारेकऱ्याकडून करण्यात आला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा मृतदेह जंगल परिसरात फेकून देण्यात आला होता. आज सकाळी कुंभारटोली गावातील […]
ADVERTISEMENT

व्यंकटेश दुडमवार, गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याअंतर्गत कुंभारटोलीलगत जंगल परिसर आहे. या परिसरात एका पंधरा ते सोळा वयोगटातील तरुणीचा आज (21 एप्रिल) सकाळी मृतदेह आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा चेहरा जाळून तिची ओळख मिटविण्याचा प्रयत्न मारेकऱ्याकडून करण्यात आला आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा मृतदेह जंगल परिसरात फेकून देण्यात आला होता. आज सकाळी कुंभारटोली गावातील काही लोक जंगल परिसरात सरपण वेचण्यासाठी गेले होते. यावेळी काही गावकऱ्यांना युवतीचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगावच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, ही हत्या नेमकी का आणि कुणी केली असावी याचा आता पोलीस शोध घेत आहेत. तसेच हत्या नेमकी कशी केली याबाबत शवविच्छेदनानंतरच नेमकी माहिती कळू शकते. ज्यानंतर गुन्ह्याचा तपास कोणत्या दिशेने करायचा हे पोलीस ठरवतील.
ही घटना काल रात्री घडली असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त. पोलिसांनी याप्रकरणी अशी शक्यता व्यक्त केली आहे की, काही अज्ञात इसमांनी या तरुणीवर अत्याचार केला असावा आणि त्यानंतर तिची हत्या केली असाी. तसेच तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा जाळण्यात आला असावा. हा प्राथमिक अंदाज असला तरी आरोपींना अटक झाल्याशिवाय या प्रकरणाचा नेमका खुलासा होणार नाही. यासाठीच आता आमगाव पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.