Mumbai Lockdown: मुंबईकरांसाठी चांगली बातमी, मुंबईत दुकानं ‘या’ वेळपर्यंत राहणार सुरु!
मुंबई: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 1 जून 2021 ते 15 जून 2021 पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय कालच (30 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जाहीर केला आहे. मात्र, यावेळी रुग्णांच्या संख्येनुसार आणि पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन नियम शिथिल अथवा कठोर निर्णय घेण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर […]
ADVERTISEMENT
मुंबई: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 1 जून 2021 ते 15 जून 2021 पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय कालच (30 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जाहीर केला आहे. मात्र, यावेळी रुग्णांच्या संख्येनुसार आणि पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन नियम शिथिल अथवा कठोर निर्णय घेण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेने घेतलेल्या काही निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अत्यावश्यक सेवेतील दुकाने (Shops) ही सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे आता मुंबईतील नागरिकांना बराच मोठा दिलासा मिळाला आहे.
….अशीच गर्दी होत राहिली तर मुंबईत निर्बंध आणखी कठोर करणार-उद्धव ठाकरे
हे वाचलं का?
पाहा मुंबई महापालिकेने लॉकडाऊनच्या नियमात नेमके काय-काय बदल केले आहेत:
1. अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दिवस उघडी राहतील.
ADVERTISEMENT
2. आवश्यकतेनुसार दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत पुढील व्यवस्थेनुसार उघडी राहतील.
ADVERTISEMENT
-
पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील तर रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील.
त्या पुढील आठवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील व रस्त्याच्या उजवीकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील.
अशाच पद्धतीने पुढील आठवड्यात दुकाने उघडी राहतीत.
शनिवार व रविवारी आवश्यकतेनुसार दुकाने पूर्णत: बंद राहतील.
3. ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूबरोबर आवश्यकतेतर वस्तूंचे वितरण करण्यास परवानगी असेल.
4. राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले ‘ब्रेक-द-चेन’ बाबतचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहतील.
5. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.
महाराष्ट्रातला Lockdown डिसेंबरपर्यंत कायम राहणार? मुख्यमंत्र्यांचा ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ काय?
6. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
7. सदरचे आदेश कधीही सुधारीत किंवा रद्द करु शकतात.
पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
-
ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.
-
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.
-
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती
-
व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील
-
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
-
पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील
-
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असतील
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT