Monsoon 2022: तुम्हा-आम्हाला सुखावणारी बातमी, मान्सून 10 दिवस आधीच भारतात धडकणार!

मुंबई तक

मुंबई: यंदा उन्हाळ्यात सूर्य नारायण अक्षरश: आग ओकत आहे. आजवरचे अनेक विक्रम मोडत पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एक सुखावणारी बातमी आता समोर आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टनुसार (European Center for Medium Range Weather Forecast) यंदा भारतात 10 दिवस आधीच मान्सून (Monsoon in India)धडकणार आहे. एजन्सीच्या मते, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: यंदा उन्हाळ्यात सूर्य नारायण अक्षरश: आग ओकत आहे. आजवरचे अनेक विक्रम मोडत पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एक सुखावणारी बातमी आता समोर आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टनुसार (European Center for Medium Range Weather Forecast) यंदा भारतात 10 दिवस आधीच मान्सून (Monsoon in India)धडकणार आहे.

एजन्सीच्या मते, मान्सून केरळच्या किनारपट्टीवर 20 किंवा 21 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये नेहमी साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होतो. त्यानंतर तो देशाच्या इतर भागात पोहोचते.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरात नुकतेच झालेले हवामान बदल अरबी समुद्रात अँटीसायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे सूचित करतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकरच पोहोचू शकतो. त्याच्या प्रभावाखाली पश्चिम विभागाच्या इतर भागातही पाऊस पडू शकतो.

IMD च्या मते, मान्सून वेळेवरच येईल

दरम्यान, आयएमडीचे हवामानतज्ज्ञ आनंद कुमार दास यांनी सांगितले की, सॅटेलाइट इमेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार मान्सून हा वेळेवरच येण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये तो 1 जून रोजी पोहचण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, विषुववृत्ताजवळ ढगांचा समूह तयार होत आहे. जो बराच सक्रिय आहे. त्यामुळे मान्सून लवकरच वेग पकडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या आठवडाभरात दक्षिण भारतातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जो मान्सूनपूर्व पाऊस मानला जातो. 20 मे च्या आसपास मान्सूनचे आगमन झाल्यास हा मोठा हंगामी बदल असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारताच्या उर्वरित भागात मान्सूनचा पाऊस वेळेपूर्वी सुरू होऊ शकतो.

देशात यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस, हवामान खात्याने जाहीर केला पहिला अंदाज

जर केरळमध्ये 20 मे रोजी मान्सून दाखल झाला, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून देशाच्या प्रत्येक भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. त्यामुळे विविध भागात भातासह इतर हंगामी पिकांच्या पेरण्या वेळेवर होण्याची शक्यता आहे. देशात 70 टक्के पाऊस मान्सूनमध्ये पडतो असे मानले जाते.

मान्सूनचा पाऊस वेळेवर आणि चांगल्या झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेली दोन वर्ष चांगल पीक होऊन देखील महाराष्ट्रातील अनेक भागात वादळं आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. मात्र, यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्यास बळीराजा मात्र नक्कीच सुखावेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp