पूरग्रस्त भागांमध्ये Governor भगत सिंह कोश्यारींचा दौरा, पण टीका आशिष शेलारांवर! काय आहे कारण?

मुंबई तक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. तळिये गावाला त्यांनी भेट दिली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार आहेत. दौरा राज्यपालांचा पण टीका मात्र आशिष शेलारांवर केली जाते आहे. सोशल मीडियात असा सूर आहे. आशिष शेलार यांचं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात निलंबन करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा विरोधी पक्षाने म्हणजेच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. तळिये गावाला त्यांनी भेट दिली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार आहेत. दौरा राज्यपालांचा पण टीका मात्र आशिष शेलारांवर केली जाते आहे. सोशल मीडियात असा सूर आहे. आशिष शेलार यांचं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात निलंबन करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा विरोधी पक्षाने म्हणजेच भाजपने उचलून धरला होता. त्यानंतर पीठासीन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना त्यांच्या दालनात धक्काबुक्की झाली आणि शिवीगाळ झाल्याचेही आरोप झाले. या घटनेनंतर ज्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्यापैकी एक आशिष शेलार आहेत. जर कुणाला घेऊन जायचं होतं तर सरकारमधल्या एखाद्या व्यक्तीला का घेऊन गेले नाहीत राज्यपाल? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे.

राजभवनाने राज्यपालांच्या दौऱ्याचा जो फोटो ट्विट केला त्यामध्ये आशिष शेलार दिसत नाहीत. त्यांचा फोटो नंतर समोर आला आहे. राज्यपालांनी दौऱ्यावर जात असताना आणि पूरग्रस्त भागांची माहिती आणि तेथील आढावा घेत असताना सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला घेऊन जाणं अपेक्षित होतं त्यांनी तसं का केलं नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे.

शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?

राज्यपालांच्या दौऱ्याबाबत आणि त्यांच्यासोबत असलेल्या आशिष शेलारांबाबत जेव्हा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवार म्हणाले की, ‘राज्यपालांना ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना ते घेऊन गेले, शेलारांवर त्यांचा विश्वास असेल. राज्यपाल दौरा करत आहेत त्यातून ते केंद्राकडून मदत आणतील अशी अपेक्षा आहे.’ असं एका ओळीचं उत्तर देऊन शरद पवार यांनी आशिष शेलार यांच्यावर बोलणं टाळलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp