रत्नागिरीत उदय सामंतांना ठाकरे गटाकडून धक्का; 3 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल काय?
–राकेश गुडेकर, रत्नागिरी आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रत्नागिरीत उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिलाय. निवडणूक झालेल्या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गट-महाविकास आघाडीचे सरपंच जिंकून आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात […]
ADVERTISEMENT

–राकेश गुडेकर, रत्नागिरी
आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रत्नागिरीत उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिलाय. निवडणूक झालेल्या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गट-महाविकास आघाडीचे सरपंच जिंकून आले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली. यापैकी चरवेली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. तर प्रतिष्ठेच्या बनलेल्या शिरगावमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट महायुती होती. मात्र शिरगावमध्ये महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक : राजन साळवींनी वर्चस्व राखलं
शिरगावमध्ये महाविकास आघाडीच्या फरिदा काझी विजयी झाल्या आहेत. तर फणसोपमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत होती. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राधिका साळवी सरपंच पदी निवडून आल्या आहेत. तर 11 पैकी 10 सदस्य ठाकरे गटाचे विजयी झाले असून, फणसोप हे शिवसेना आमदार राजन साळवी यांचं गाव आहे.