जीएसटीमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा प्रहार! पिठापासून ते पनीरपर्यंत… ‘या’ वस्तू महागल्या
कोरोनामुळे उत्पन्नात घट झालेली असतानाच सर्वसामान्यांना महागाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पीठ, दही, लस्सी, पनीर पासून ते स्टेशनरी आणि हॉस्पिटलपर्यंत अनेक गोष्टींसाठी जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. जीएसटी परिषदेनं दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवर जीएसटी आकारण्यास सुरुवात केली आहे. डेअरीच्या वस्तू महागल्या जीएसटी परिषदेनं अनेक डेअरी उत्पादन जीएसटीच्या कक्षेत आणल्या आहेत. यात दही, लस्सी, पनीर […]
ADVERTISEMENT

कोरोनामुळे उत्पन्नात घट झालेली असतानाच सर्वसामान्यांना महागाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पीठ, दही, लस्सी, पनीर पासून ते स्टेशनरी आणि हॉस्पिटलपर्यंत अनेक गोष्टींसाठी जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. जीएसटी परिषदेनं दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवर जीएसटी आकारण्यास सुरुवात केली आहे.
डेअरीच्या वस्तू महागल्या
जीएसटी परिषदेनं अनेक डेअरी उत्पादन जीएसटीच्या कक्षेत आणल्या आहेत. यात दही, लस्सी, पनीर आणि छाछ यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर जीएसटी परिषदेच्या नव्या निर्णयामुळे मासेही महागणार आहेत. या वस्तुंवर सरकारने ५ टक्के जीएसटी लागू केला आहे. या वस्तू पूर्वी जीएसटीच्या कक्षेबाहेर होत्या, म्हणजेच जीएसटी आकारला जात नव्हता.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॅकिंग फूड प्रोडक्ट्सवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ब्रॅण्ड नसलेले मात्र पॅकिंग असलेल्या पीठ, डाळींवरही ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
रुग्णालयातील खर्च वाढणार
रुग्णालयात उपचार घेण्यासाठी लोकांना जास्त खर्च करावा लागणार आहे. रुग्णालयात आयसीयूशिवाय वेगळ्या रुम्स असतात, ज्यासाठी प्रति दिवस ५००० हजारापेक्षा अधिक पैसे आकारले जातात. सरकार आता यावरही ५ टक्के जीएसटी आकारणार आहे. यापूर्वी हे जीएसटीच्या कक्षेत नव्हतं.