गुजरातमध्ये आढळला कोरोना XE व्हेरिएंटचा रूग्ण, अत्यंत संसर्गजन्य आहे हा व्हेरिएंट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरनाच्या व्हायरसच्या XE व्हेरिएंटने गुजरातमध्ये धडक दिली आहे. याआधी मायानगरी मुंबईत व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळून आला होता. हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य मानला जातो आहे. त्यामुळे सरकार सर्वतोपरी काळजी घेताना दिसतं आहे.

ADVERTISEMENT

गुजरातमध्ये ज्या रूग्णाला XE व्हेरिएंटची बाधा झाली आहे तो १३ मार्चला पॉझिटिव्ह आला होता. एका आठवड्यानंतर त्याची प्रकृती सुधारली. मात्र या रूग्णाचे सँपल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते ज्याचा निकाल समोर आल्यानंतर या रूग्णाला XE व्हेरिएंटची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. हा व्हेरिएंट आजवरच्या व्हेरिएंटपेक्षा सर्वाधिक संसर्गजन्य आहे असं मानलं जातं आहे.

आधी असं सांगितलं जात होतं की XE व्हेरिएंट हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचाच सब व्हेरिएंट आहे. आत्तापर्यंत हा व्हेरिएंट धोकादायक यादीत नाही. मात्र हे सांगितलं जातं आहे की या व्हेरिएंटमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. सध्या XE व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळले आहेत. मात्र त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणं नाहीत. कुणीही घाबरून जाऊ नये असंही आवाहन सरकारने केलं आहे.

हे वाचलं का?

तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

जॉन हॉफकिन्स च्या गुप्ता क्लिंस्की इंडिया इन्स्टिट्युटद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रात व्हायरॉलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांनी हे सांगितलं की कोरोनाचे नवे नवे व्हेरिएंट्स येणारच. कारण लोक आता प्रवास करत आहेत. XE व्हेरिएंट सध्या तरी चिंतेचा विषय नाही. यााधी आपण सगळे BA.2 या व्हेरिएंटमुळे चिंतित होतो. मात्र हा व्हेरिएंटही BA.1 पेक्षा जास्त गंभीर नव्हता. XE व्हेरिएंट हा देखील या दोन व्हेरिएंटपेक्षा जास्त गंभीर नाही.

ADVERTISEMENT

तर दुसरीकडे काही तज्ज्ञांचं म्हणणं हे आहे की एखादा नवा व्हेरिएंट कोरोनाची चौथी लाटही देशात आणू शकतो. फक्त तो अधिक घातक नसेल आणि परिस्थिती नियंत्रणात असेल. जेव्हा देशात कोरोनाची तिसरी लाट आली होती तेव्हाही देशातली आरोग्य स्थिती नियंत्रणात होती. पहिल्या दोन लाटांप्रमाणे कोरोनाचा कहर पाहायला मिळाला नाही.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या एक्सई या नव्या उपविषाणूची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांना पत्र पाठवलं असून, सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यातील नव्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम या राज्यांना पत्र पाठवलं आहे. पत्रात वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त करताना भूषण यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या नव्याने वाढत्या रुग्णसंख्येवर नजर ठेवली जावी. त्याचबरोबर गरज निर्माण झाल्यास आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT