H3N2 Virus : भारतात H3N2 विषाणूचे 2 बळी, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
H3N2 Virus kills 2 Patient : देशात H3N2 विषाणूने थैमान घातला आहे. या विषाणूने प्रथमच देशात 2 बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. हे दोन बळी हरीयाणा आणि कर्नाटकचे रहिवाशी असल्याची माहीती आहे. या घटनेने देशात खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. दरम्यान हा H3N2 विषाणू नेमका आहे तरी काय? या […]
ADVERTISEMENT
H3N2 Virus kills 2 Patient : देशात H3N2 विषाणूने थैमान घातला आहे. या विषाणूने प्रथमच देशात 2 बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. हे दोन बळी हरीयाणा आणि कर्नाटकचे रहिवाशी असल्याची माहीती आहे. या घटनेने देशात खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. दरम्यान हा H3N2 विषाणू नेमका आहे तरी काय? या विषाणूचे लक्षणे आणि उपचार काय आहेत? ती जाणून घेऊयात.(h3n2 virus kills 2 in india what to know about symptoms treatment)
ADVERTISEMENT
कर्नाटकात पहिला बळी
देशात H3N2 विषाणूचा पहिला बळी कर्नाटकात गेला. हसन तालूक्यात राहणाऱ्या 82 वर्षीय अलूर तलूक यांना 24 फेब्रुवारीला हसन इस्टि्टयूट ऑफ मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.गेल्या 1 मार्चला त्यांचा मृत्यू झाला होता. या रूग्णाला ताप, घसा खवखवणे आणि कफ सारखी समस्या सतावत होती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या घटनेने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, देशभरात आतापर्यंत H3N2 विषाणूची 90 रूग्ण सापडले आहेत. या रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे ही बाब चिंताजनक आहे.
काय आहे H3N2 विषाणू?
सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अॅन्ड प्रिवेन्शन (CDC) नुसार, H3N2 हा एक गैर मानवी इन्फ्लूएंझा विषाणू आहे जो सामान्यत डुकरांमध्ये सापडतो. हा विषाणू माणसांना संक्रमित करतो त्यामुळे त्याला स्वाईन इन्फ्लूएंझी वायरस म्हणतात. जेव्हा हे विषाणू माणसांना संक्रमित करतात, तेव्हा त्यांना ”वेरीयंट” व्हायरस म्हणतात. दरम्यान H3N2 प्रकारचा विषाणू 2011 मध्ये एव्हीयन, स्वाइन आणि मानवी विषाणूतील जीन्स आणि H1N1 साथीच्या विषाणू M जनुकासह मानवांमध्ये आढळला होता, असे सीडीसीने सांगितले आहे. सध्या H3N2 विषाणूची तीव्रता सीझनल फ्लु सारखी आहे.
हे वाचलं का?
Mumbai Police : ६० दिवसांत करा भाडेकरूची पडताळणी, का आणि किती आहे महत्त्वाची?
लक्षणे काय?
या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, कफ, गळणार नाक, शरीरात वेदना, मळमळ, उलट्या किंवा अतिसाराची लक्षणे आढळतात. हे आजार नागरीकांमध्ये जास्तीत जास्त आठवड्याभर कायम राहतात. काहींना तर हे आजार बरे होण्यास 2-3 आठवडे लागत आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीसांच्या बजेटमध्ये मराठवाड्याला काय मिळालं?
ADVERTISEMENT
उपचार काय?
विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा सल्ला दिला जात आहे.ओसेल्टामिवीर, झानामिवीर, पेरामिवीर आणि बालॉक्सावीर सारखी औषधे तुम्हाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार घेता येणार आहेत. तसेच या आजारांचा धोका होऊ नये यासाठी नागरीकांना नियमित हात धुवावे, अन्न सेवन करण्यापुर्वी आणि आपला चेहरा, नाक किंवा तोंडाला स्पर्श करण्यापुर्वी हात धुवा. तसेच नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे आणि आजारी रूग्णाशी थोंड लांबच राहणे फायद्याचे ठरेल.
Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीसांकडून महापालिका निवडणुकीसाठी ‘मत’पेरणी!
दरम्यान वरील गोष्टीची काळजी घेतल्यास तुम्हाला या विषाणूची लागण होणार नाही. त्यामुळे या गोष्टीचे पालन करा आणि स्वत:चा बचाव करा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT