हॅकरमुळे हैराण! क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, फोन नंबर, आधार कार्ड सारंकाही झालं हॅक तरीही….

किरण तारे

चंदन कुमार हे 52 वर्षीय उच्च पदस्थ अधिकारी आहेत. मुंबईतल्या एका चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत ते एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. मात्र सध्या त्यांची अवस्था हैराण, परेशान अशीच झाली आहे. कारण आत्तापर्यंत हॅकिंगचा सामना त्यांना अनेकदा करावा लागला आहे. त्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स, फोन नंबर, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट हे सगळं ऑक्टोबर 2021 पासून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

चंदन कुमार हे 52 वर्षीय उच्च पदस्थ अधिकारी आहेत. मुंबईतल्या एका चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत ते एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. मात्र सध्या त्यांची अवस्था हैराण, परेशान अशीच झाली आहे. कारण आत्तापर्यंत हॅकिंगचा सामना त्यांना अनेकदा करावा लागला आहे. त्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स, फोन नंबर, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट हे सगळं ऑक्टोबर 2021 पासून हॅक झालं आहे. यानंतर त्यांनी अर्थातच पोलिसात तक्रार केली आणि आपली अकाऊंट कोण हॅक करतो आहे हे जाणून घेण्यासाठी एका एथिकल हॅकरचीही नियुक्ती केली. पण तरीही चंदन कुमार यांची अकाऊंट कोण हॅक करतं आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही.

चंदन कुमार हे श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती आहेत. मास्टर्स ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन करून त्यांनी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये काम केलं आहे. भारतात येण्यापूर्वी आठ वर्षे ते लंडन आणि सिंगापूरला राहात होते. त्यांच्या पत्नीचं नाव मोसमी आहे. तसंच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ऑक्टोबरपासून होणाऱ्या हॅकिंगच्या प्रकरणांमुळे चंदन कुमार कुटुंबाने फक्त प्रायव्हसीच नाही गमावली तर त्यांची झोपही उडाली आहे.

चंदन कुमार यांचं म्हणणं आहे की माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नंबरवरून आपोआप कॉल केले जात आहेत. अनेक अॅप आपोआप इन्स्टॉल होत आहेत. हॅकरने आमच्या मोबाईलवर आणि ईमेल आयडीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे आम्ही एक प्रकारे त्याच्या हातचे बाहुलेच झालो आहेत.

हा हॅकर आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना, मित्रांना दिवसातून अनेकदा कॉल करतो. मी किंवा मौसमी फोन करत असल्याचा आभास तो निर्माण करतो. एकदा फोन किंवा व्हॉट्स अॅप कॉल केला की तो हॅकर काहीही बोलत नाही. या सगळ्याचा आम्हाला मानसिक त्रास होतो आहे. 25 फेब्रुवारीला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करू असा विचार करत होतो. त्यावेळी त्या हॅकरने आमच्या नातेवाईकांना कॉल करून हैराण केले. त्यानंतर त्यांचे आम्हाला हे विचारण्यासाठी फोन येत होते की नेमकं काय झालं आहे? आम्ही या सगळ्यामुळे प्रचंड त्रासलो आहोत असंही चंदन कुमार यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp