हर हर महादेव वाद : जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, अभिजित देशपांडेंनी सांगितले पुस्तकाचं नाव
हर हर महादेव चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात शो पाडला. यावेळी धक्काबुक्की आणि मारहाण झाल्यानं गोंधळ उडाला होता. या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाबद्दलचे आक्षेप नोंदवले. त्याला आता हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडेंनी उत्तर दिलंय. ठाण्यात वाद झाल्यानंतर अभिजित देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. […]
ADVERTISEMENT

हर हर महादेव चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात शो पाडला. यावेळी धक्काबुक्की आणि मारहाण झाल्यानं गोंधळ उडाला होता. या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाबद्दलचे आक्षेप नोंदवले. त्याला आता हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडेंनी उत्तर दिलंय.
ठाण्यात वाद झाल्यानंतर अभिजित देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
अभिजित देशपांडे म्हणाले….
“सिनेमावर ज्या मुद्द्यांमुळे आक्षेप घेतला जातोय. तेच मुद्दे आम्हाला सेन्सॉर बोर्डाने विचारले होते. आम्ही ऐतिहासिक पुरावे, दस्ताऐवज सेन्सॉर बोर्डाकडे सुपूर्द केले. त्यानंतर आम्हाला प्रमाणपत्र दिलं गेलं. आम्हाला याबद्दल काही बोलायचं नाहीये”, असं अभिजित देशपांडे म्हणाले.
“काल लाच्छनांस्पद प्रकार घडला. काही लोकांनी चित्रपटगृहात घुसून मराठी माणसांना मारहाण केली. जे सिनेमा बघायला आले होते. त्यांचे कपडे फाडले. त्यामुळे मला असं वाटलं की, आमची भूमिका मांडावी”, असं म्हणत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.