दानवे, तुम्ही निवडून कसे येता तेच बघतो: हर्षवर्धन जाधव
रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंवर जोरदार टीका करताना लोकसभा निवडणुकीत दानवेंच्या नाकात दम आणल्याशिवाय राहणार नाही असे सरळ आव्हान दिलं आहे. रावसाहेब दानवेंनी दिल्लीत असताना वक्तव्य केलं होतं की हर्षवर्धन मी तुला नाक घासायला लाविन. पण मी तुमच्या माध्यमातून दानवेंना सांगतो की पुढच्या वेळी तुम्ही जालन्यातून खासदार कसे होता हेच पाहतो असे […]
ADVERTISEMENT
रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंवर जोरदार टीका करताना लोकसभा निवडणुकीत दानवेंच्या नाकात दम आणल्याशिवाय राहणार नाही असे सरळ आव्हान दिलं आहे. रावसाहेब दानवेंनी दिल्लीत असताना वक्तव्य केलं होतं की हर्षवर्धन मी तुला नाक घासायला लाविन. पण मी तुमच्या माध्यमातून दानवेंना सांगतो की पुढच्या वेळी तुम्ही जालन्यातून खासदार कसे होता हेच पाहतो असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.
गेले काही दिवस धुमसत असलेला रावसाहेब दानवे विरुद्ध हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
माझ्याविरुद्ध षडयंत्र रावसाहेब दानवेंनी रचले. दानवेंनी स्थानिक पोलीसांवर दबाव आणून माझ्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करायला लावला असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘आम्ही न्याय मिळावा म्हणून अनेकांना भेटलो. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मानवाधिकार आयोगाकडे आम्ही दाद मागितली पण आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारने यात लक्ष घालावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावं,’ अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.
हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई असून गेले काही दिवस दानवे आणि जाधव यांच्यातला संघर्ष धुमसत आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्यासोबत इशा झा या महिलेला एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली म्हणून अटक झाली होती. या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांनी न्य़ायालयाने जामीन मंजूर केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT