भयंकर घटना! खोदकाम करताना कोसळली दरड; पोकलेनसह 10 वाहनं ढिगाऱ्याखाली, एकाचा मृत्यू
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच हरयाणामध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. हरयाणातील भिवानी जिल्ह्यात खोदकाम करताना दरड कोसळून 8 ते 10 वाहनं ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. त्याचबरोबर 15 ते 20 नागरिकही ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू केलं आहे. तिघांना सुखरुप बाहेर काढलं असून, एकाचा मृतदेह मिळाला आहे. स्थानिक […]
ADVERTISEMENT
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच हरयाणामध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. हरयाणातील भिवानी जिल्ह्यात खोदकाम करताना दरड कोसळून 8 ते 10 वाहनं ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. त्याचबरोबर 15 ते 20 नागरिकही ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू केलं आहे. तिघांना सुखरुप बाहेर काढलं असून, एकाचा मृतदेह मिळाला आहे.
ADVERTISEMENT
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे डाडम उत्सखनन क्षेत्रात डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळला. त्यामुळे त्या ठिकाणी असलेली 8 ते 10 वाहनं दरडीखाली दबली गेली. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि जिल्हा प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली. मदत व बचाव कार्य वेगाने केलं जात असून, आतापर्यंत तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नागरिकांना आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना घटनास्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. माहिती मिळाल्यानंतर हरयाणाचे कृषी मंत्री जेपी दलाल आणि पोलीस अधीक्षक अजित सिंह शेखावत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.
हे वाचलं का?
भिवानी जिल्ह्यातील डाडममध्ये ही घटना घडली आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून, उत्खननसाठी वापरण्यात येणारी पोकलेन आणि इतर मोठी मशीनही दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. दरड कशामुळे कोसळली हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, प्रशासनाकडून ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात असून, बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
खाणक आणि डाडम येथे दोन आठवड्यांपासून उत्सखनन केलं जात आहे. हवा प्रदूषित होत असल्यानं 2 महिन्यांपूर्वी उत्खननावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने दोन आठवड्यांपूर्वी पुन्हा उत्खनन करण्यास परवानगी दिली होती. उत्खननासाठी स्फोट घडवून आणण्यात आले असावेत अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT