Kumbh Mela 2021 : महानिर्वाणी अखाड्याचे प्रमुख स्वामी कपिल देव यांचं कोरोनाने निधन
महानिर्वाणी आखाड्याचे प्रमुख स्वामी कपिल देव यांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. गुरूवारी त्यांचं निधन झालं, कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी ते कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. मध्यप्रदेशातून ते आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना देहरादून येथीलन कैलाश रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची RTPCR टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर […]
ADVERTISEMENT
महानिर्वाणी आखाड्याचे प्रमुख स्वामी कपिल देव यांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. गुरूवारी त्यांचं निधन झालं, कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी ते कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. मध्यप्रदेशातून ते आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना देहरादून येथीलन कैलाश रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची RTPCR टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
पोलीस अधीक्षक सरिता डोभाल यांनी यांनी स्वामी कपिल देव यांचं निधन झाल्याची माहिती दिली. हरिद्वारमध्ये 10 ते 14 एप्रिल या चार दिवसांमध्ये 1701 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी येतो. गेल्या चार दिवसांमध्ये या ठिकाणी दोन शाही स्नान सोहळे पडले. इतरही अनेक अहवाल येणं अद्याप बाकी आहेत. कुंभमेळा हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरतो आहे हेच दिसून येतं आहे. अशात आता महानिर्वाणी अखाड्याचे प्रमुख स्वामी कपिल देव यांचं कोरोनाने निधन झालं आहे.
कुंभमेळा ठरतोय नवा Corona Hotspot! हरिद्वारमध्ये 1701 केसेस पॉझिटिव्ह
हे वाचलं का?
कोरोना महामारीच्या काळातच कुंभमेळा आला आहे. या कुंभमेळ्याला लाखो भाविकांची स्नानासाठी गर्दी होते आहे. शाही स्नानही पार पडलं आहे. शैव आणि वैष्णव पंथियांचा मेळा या ठिकाणी येत असतो. हरिद्वारमध्ये कोरोनाची चाचणीही केली जात नाहीये तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं चित्र पाहण्यास मिळतं आहे. त्यामुळेच 1701 जण गेल्या पाच दिवसांमध्ये पॉझिटि्व्ह झाले आहेत. आणखी काही चाचण्यांचे निकाल येणं बाकी आहे अशी माहिती हरिद्वारचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी शंभू कुमार झा यांनी इंडिया टुडेला दिली आहे.
कोव्हिड प्रोटोकॉलचेही तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरणार यात काहीही शंका दिसत नाहीये. एकीकडे देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जातो आहे. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. दिल्लीत वीक एन्ड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशात साधू कुंभमेळा साजरा करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT