शरद पवारांच्या नावे सुरू होणार आरोग्य योजना; धनंजय मुंडेंनी केली घोषणा
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून लवकरच नवीन आरोग्य योजना आणली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे ही योजना राज्यात लागू केली जाणार असून, याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. […]
ADVERTISEMENT

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून लवकरच नवीन आरोग्य योजना आणली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे ही योजना राज्यात लागू केली जाणार असून, याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी प्रस्तावित असलेल्या आरोग्य योजनेची घोषणा केली.
साठीनंतर ज्येष्ठ नागरिकांना अनेक आजार बळवतात. या आजारांचं निदान करण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. या चाचण्या खर्चिक असतात. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणंही शक्य होत नाही. या सगळ्या बाबींचा विचार करून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद पवार यांच्या नावे आरोग्य योजना आणण्याचं प्रस्तावित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
शरद शतमः असं योजनेचं नाव असेल, असंही धनंजय मुंडे म्हणाले. याचा लाभ राज्यातील हजारो वयोवृद्ध नागरिकांना होईल. ही योजना सध्या प्रस्तावित असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले.