कसब्यात BJPचा ‘करेक्ट कार्यक्रम’ नेमका केला तरी कोणी?, वाचा इंटरेस्टिंग माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

BJP defeat in kasba constituency caused is nota: पुणे: पुण्यातील (Pune) कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-Poll) नोटा (Nota) आणि नोट यांचा खूप बोलबाला झाला. आता दोघांचाही निकाल लागला आहे. ब्राह्मण समाजाच्या नाराजीमुळे नोटाचा फॅक्टर भाजपचा (BJP) गेम करू शकतो, अशा चर्चा खूप होत्या. तसे बॅनरही कसब्यात लागल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. पण आता या सगळ्यांचा नेमका निकाल लागला आहे. कसब्यात नोटाचा फॅक्टर हेमंत रासनेंच्या (Hemant Rasane) पराभवाला कारणीभूत ठरला का? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (hemant rasane defeat in kasba constituency caused the factor of nota)

ADVERTISEMENT

एरवी बहुरंगी होणारी कसब्याची निवडणूक यंदा दुरंगी झाली. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यात थेट फाईट झाली. गेल्या 25 वर्षांपासून ब्राह्मण समाजाच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात भाजपने भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. ओबीसी समाजातल्या रासनेंना तिकीट दिलं. त्यामुळे जवळपास 13 टक्के मतदारसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला जड जाईल असं म्हटलं गेलं. एवढंच नाही, तर ब्राह्मण समाज नोटाचं बटन दाबणार असल्याचे बॅनरही कसब्यात लागले होते.

भाजपने डॅमेज कंट्रोल करण्याचाही यावेळी बराच प्रयत्न केला. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ब्राह्मण समाज नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतरच सगळ्यांचं लक्ष नोटाला किती मतं मिळणार याकडे लागलं होतं.

हे वाचलं का?

Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

गुरुवारी 2 मार्चला कसब्याचा निकाल लागला. यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी झाले. धंगेकरांना 73 हजार 194, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली. तर अंधेरी पोटनिवडणुकीत कळीचा फॅक्टर ठरलेल्या नोटाला तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 1 हजार 397 मतं मिळाली. म्हणजेच यंदा नोटाचा टक्का घसरला असला, तरी थेट लढतीमुळे नोटा फॅक्टर तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. गेल्यावेळी कसब्यात नोटाला 2 हजार 532 एवढी मतं मिळाली होती.

ADVERTISEMENT

दुसरीकडे ब्राह्मण समाजाच्या मतांवर भिस्त असलेल्या हिंदू महासभेच्या आनंद दवेंच डिपॉझिट जप्त झालं आहे. त्यांना केवळ 296 एवढी मतं मिळाली. नोटा आणि आनंद दवे यांची मतं एकत्र केली तरी भाजपचं विजयाचं गणित पूर्ण होऊ शकत नाही. तब्बल 28 वर्षांनी भाजपचा बालेकिल्ल्यातच पराभव झाला आहे.

ADVERTISEMENT

Kasba-Chinchwad पोटनिवडणूक निकालाच्या इंटरेस्टिंग टॉप १० बातम्या एकाच क्लिकवर

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांना 75 हजार 449 मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना 47 हजार 296 मतं मिळाली होती. या निवडणुकीत मनसेचे अजय शिंदे यांना 8 हजार 284 मतं मिळाली होती. गेल्या निवडणुकीचा निकालातील मतांशी तुलना केल्यास भाजपची मतं घटली आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेसनं पुन्हा एकदा कसबा पेठ मतदारसंघावर कब्जा केला आहे. 1991 मध्ये काँग्रेसचे वसंत थोरात कसबा पेठ निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर 1995 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापटांनी विजय मिळवला. 1995 पासून 2014 पर्यंत भाजपचे गिरीश बापट हे पाच वेळा कसबा पेठ मतदासंघातून निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये मुक्ता टिळक यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्याही निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आणि पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT