हिंगोली : मंदिरातील दानपेट्या चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या, लुटमारीच्या घटनांनी धुमाकूळ घातला होता. वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीला कंटाळून हिंगोलीत व्यापाऱ्यांकडून बंद पाळण्यात आला होता. अखेरीस व्यापारी आणि नागरिकांचा वाढता रोष बघता हिंगोली पोलीसांनी तात्काळ कारवाईची चक्र फिरवत दोघांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

हिंगोली तालुक्यातील इढोळी महादेव मंदिर व शहरातील पार्श्वनाथ जैन मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची घटना घडली होती. घटनेचा छडा लावत  पोलिसांनी दोन भुरट्या चोरांना बेड्या ठोकल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कालसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

Crime: किराणा दुकान आणि घरात सापडला शस्त्र साठा, हजारो रुपयांचा गुटखा आणि दारूही जप्त

हे वाचलं का?

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, लुटमार, दरोडा अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी वसमत येथे बंदुकीचा धाक दाखवून गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याला लुटलं होतं. इतकच नव्हे तर हिंगोली शहरात काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला लुटून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी पळवला. काही दिवसांपूर्वी एका बँक अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीवर चाकुने हल्ला करत ऐवज लुटल्याची घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी सोडेगाव येथे चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

याविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारत पोलीस यंत्रणेवद दबाव टाकल्यानंतर पोलिसांनी दोन भुरट्या चोरांना अटक केली आहे. परंतू जिल्ह्यात सर्रास सुरु असलेले अवैध धंदे, मटका, जुगार, गांजाची विक्री याकडे पोलीस कानाडोळा का करत आहेत अशी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT