थरकाप उडवणारा अपघात! वेगवान बाईक डिव्हायडरवर आदळली; तरुण-तरुणी जागीच ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काळजाचा थरकाप उडावा असा अपघात आज पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात घडला आहे. रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडरवर) आदळून बाईक अपघातग्रस्त झाली. यात बाईकवरून तरुण आणि तरुणी उडून खाली पडले. यात दोघेही जागीच ठार झाले. दरम्यान, अपघातानंतर केटीएम बाईकमधून पेट्रोल गळती होऊ आग लागली. नंतर आग विझवण्यात आली. या अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या दोन महिलाही जखमी झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, अपघाताचे कारणही समोर आलं आहे. वेगात असलेल्या केटीएम बाईकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

हे वाचलं का?

अपघातात मरण पावलेल्या 25 वर्षीय युवकाचे नाव आर्यन परमार असं सांगण्यात आलं, तर तरुणीचं नावाबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. आर्यन रविवारी दुपारी आपल्या केटीएम बाइकवरुन एका मुलीसह जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून आकुर्डी परिसरातून जात होता. आर्यनच्या मोटारसायकलचा वेग खूप होता. समोरील गाडीचा वेग कमी झाल्यानंतर मोटारसायकल डिव्हायडरवर जाऊ आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की, बाईक डिव्हायडर आदळल्यानंतर आर्यनसह त्याची मैत्रिणी दूर फेकले गेले. यात आर्यनसह त्यांच्या मैत्रिणीचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताचा हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ADVERTISEMENT

अपघातानंतर आर्यनच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तर त्याच्या मैत्रिणीची कवटी फूटून मेंदू 20 ते 40 मीटरपर्यंत फेकला गेला. या अपघातनंतर लगेच मोटारसायकलमधून पेट्रोल गळती झाली. पेट्रोल गळून बाईकने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गाडीला लागलेली आग विझवली. तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.

ADVERTISEMENT

या अपघातात सस्त्यावरून जाणाऱ्या दोन महिला जखमी झाल्या आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी स्थानिकांनी प्रसगांवधान दाखवत दोन्ही जखमी महिलांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT