भयंकर! माथेरानमध्ये सापडला महिलेचा शिर नसलेला मृतदेह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महेबूब जमादार, रायगड

ADVERTISEMENT

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शिरच्छेद केल्याच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता माथेरानमध्ये अशीच एक अंगावर काटे आणणारी घटना घडली आहे. माथेरानमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाचं शिर बेपत्ता असून, सोबत आलेला आरोपी पुरुष ते घेऊन गेल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. या घटनेनंतर माथेरानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी काही फोटो आणि सीसीटीव्ही प्रसिद्ध केले असून, त्यांना ओळखणाऱ्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

महिलांवरील वाढते अत्याचार आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच आता माथेरानमध्ये खळबळ उडवून देणारी हत्येची घटना समोर आली आहे. माथेरानमध्ये एका महिलेची शिर कापून हत्या करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

माथेरानमधील इंदिरा नगरमध्ये ही घटना घडली. घरमालक अनधिकृतपणे घरामध्येच लॉजिंग चालवतो. ज्या रुममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला, ती रुम घरमालकाने दोघांचे ओळखपत्र न तपासताच दिली होती. त्याचबरोबर त्या दोघांनाच रजिस्टरमध्ये लिहायला सांगितलं होतं. याच खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेचा मृतदेह निर्वस्त्र आणि शिर नसलेल्या अवस्थेत आढळून आला असून, घटनास्थळी कोणतीही बँग अथवा सामान आढळून आलेलं नाही. त्यामुळे मयत महिला कोण याबाबतची माहिती कळू शकलेली नाही.

ADVERTISEMENT

Crime : बहिणीची हत्या करुन मृतदेह ठेवला घरात, सोसायटीत दुर्गंधी पसरल्यामुळे झाला उलगडा

ADVERTISEMENT

महिला व पुरुष माथेरानमध्ये फिरायला आले होते. त्यानंतर महिलेचा मृतदेह आढळून आला असून, पुरूष गायब आहे. महिलेचं शिर आरोपी सोबत घेऊन गेला असावा, असं ग्रामस्थ सांगत आहेत.

स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृश्यांची पाहणी केली. यात एक जोडप पोलिसांच्या निदर्शनास आढळून आलं असून, त्याचे फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत.

दरम्यान, माथेरान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. सध्या पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. रायगड पोलीसांनी चार फोटो ज्यामध्ये एक महिला व एक पुरुषाचे सीसीटीव्ही फोटो जारी केले आहेत. तसेच यांना ओळखणाऱ्यांनी रायगड पोलिसांच्या गुन्हे शाखेशी अथवा माथेरान पोलिसांशी सपंर्क करण्याचं आवाहन केलं आहे.

औरंगाबादमध्ये भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना घडली. कीर्ती थोरे असं या मुलीचं नाव आहे. प्रेमविवाह केल्याच्या कारणातून ही हत्या करण्यात आली. किचनमध्ये गेलेल्या बहिणीचा भावाने शिरच्छेद केला. इतकंच नाही, तर तिचं शिर घेऊन तो बाहेरच्या ओट्यावर आला आणि कीर्तीच्या सासरकडच्या लोकांना दाखवलं. या घटनेची चर्चा असतानाच आता राज्यात शिरच्छेद केल्याची दुसरी घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT