मध्य प्रदेशच्या रिवामध्ये भीषण अपघात १४ जण ठार, ४० जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मध्य प्रदेशच्या रिवामध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या नॅशनल हायवे ३० वर हा भीषण अपघात झाला आहे.

ADVERTISEMENT

काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या नॅशनल हायवे ३० वर हा अपघात घडला आहे. अपघात झालेली बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. रात्री ११.३० च्या सुमारास रिवाजवळ हा अपघात झाला. बसमधले सर्व प्रवासी कामगार होते. दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी जात होते. घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. पोलिसांच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. तसंच गाडीत किती नेमके प्रवासी होते ते कुठले निवासी होते त्यांची नावं यासंदर्भात अद्याप कुठलीही माहिती समोर आली नाही. पण बसमध्ये ५४ प्रवासी असल्याचं बोललं जातं आहे.

हे वाचलं का?

ट्रॉलीने बसला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. रीवा येथील सुहागी पहाडी जवळ ही घटना घडली असल्याचं रिवाचे पोलिस अधीक्षक नवनीत भसीन यांनी म्हटलं आहे. तसंच, बसमध्ये असलेले सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशचे स्थानिक असल्याचं बोललं जातंय. जखमी असलेल्या ४० जणांपैकी २० जणांना प्रयागराजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT