हॉटेल्स रात्री 1 पर्यंत, मद्यविक्री रात्री 10.30 पर्यंत सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तक: खवय्यांसाठी आणि शॉपिंगप्रेमींसाठी खुषखबर आहे. आता हॉटेल्स आणि फूड कोर्ट्स रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवायला तर दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवायला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेने पत्रक काढून ही माहिती दिली आहे. तर, त्या पत्रकात मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना रात्री 10 पर्यंत दुकानं सुरू ठेवता येणार आहेत.

ADVERTISEMENT

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शनिवारी परिपत्रक काढलं आहे. लॉकडाउनमध्ये लोकांची गर्दी टाळण्यासाठी दुकान, हॉटेल्स, फूड कोर्ट यांवर काही निर्बंध घातले होते. ही निर्बंध 28 फेब्रुवारीपर्यंत घालण्यात आली होती. रात्री 11.30 वाजेपर्यंत हॉटेल्स आणि फूड कोर्ट उघडी ठेवण्याचे सांगण्यात आले होते. पालिका शनिवारी काढलेल्या (6 फेब्रुवारीला) काढलेल्या परिपत्रकानुसार हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर, दुकानं सकाळी 7 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. मद्यविक्री करणाऱ्या दुकानांन सकाळी 10 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन च्या माध्यमातून लॉकडाउनमध्ये लादलेली निर्बंध आता हळू हळू हटवायला सुरुवात केली आहे. पण, प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानांना मात्र नवीन परिपत्रकाच्या वेळा लागू होणार नसल्याचेही या परिपत्रकात म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT