Budget: नव्या स्लॅबनुसार आता तुम्हाला किती मोजावा लागणार Tax?

मुंबई तक

How much tax will be levied on your income: नवी दिल्ली: लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) 2024 साली आहे. मात्र, आतापासूनच मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्याची खेळी मोदी सरकारने (Modi Govt) खेळली आहे. अर्थसंकल्पातून (Budget 2023) प्राप्तिकरात (Income Tax) सूट मिळावी, अशी अपेक्षा आणि मागणी बहुतांश सामान्य माणसांना असते. यावेळी मोदी सरकारने बऱ्याच वर्षांनंतर अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठी भेट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

How much tax will be levied on your income: नवी दिल्ली: लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) 2024 साली आहे. मात्र, आतापासूनच मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्याची खेळी मोदी सरकारने (Modi Govt) खेळली आहे. अर्थसंकल्पातून (Budget 2023) प्राप्तिकरात (Income Tax) सूट मिळावी, अशी अपेक्षा आणि मागणी बहुतांश सामान्य माणसांना असते. यावेळी मोदी सरकारने बऱ्याच वर्षांनंतर अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. (how much do you earn know How much tax will be levied on your income after new slab)

खरं तर, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात नवीन आयकर स्लॅब आणला आहे. ज्यामध्ये बहुतेक मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार वार्षिक 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

वैयक्तिक आयकराचा नवीन कर दर खालीलप्रमाणे आहे.

आता 0 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कराची तरतूद आहे. 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5%, 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10%, 9 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15%, 12 ते 15 लाख आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 20% उत्पन्न मिळेल. 30% आयकर आकारला जाईल.

हे वाचलं का?