धार्मिक स्थळांच्या माध्यमातून कोव्हिड रुग्णांची सेवा करणारे कोव्हिड योद्धे
हर्षदा परब/ सौरभ वक्तानिया मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय त्याबरोबरच वैद्यकीय सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतोय. सरकारी यंत्रणा जिथे हतबल आहे. तिथे धार्मिक संस्था माणुसकीची मशाल हातात घेऊन लोकांचे जीव वाचवताना दिसत आहेत. भेंडीबाजारमध्ये फूल गल्ली मशिदीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजनच्या सिलेंडरा पुरवठा करण्यात येतोय. तर कांदिवलीमध्ये पाच मजली जैन मंदिरमध्ये कोव्हिड […]
ADVERTISEMENT
हर्षदा परब/ सौरभ वक्तानिया
ADVERTISEMENT
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय त्याबरोबरच वैद्यकीय सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतोय. सरकारी यंत्रणा जिथे हतबल आहे. तिथे धार्मिक संस्था माणुसकीची मशाल हातात घेऊन लोकांचे जीव वाचवताना दिसत आहेत. भेंडीबाजारमध्ये फूल गल्ली मशिदीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजनच्या सिलेंडरा पुरवठा करण्यात येतोय. तर कांदिवलीमध्ये पाच मजली जैन मंदिरमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आलंय.
हे वाचलं का?
राज्यात कोव्हिड रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत. तर, दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो. मुंबईतल्या भेंडीबाजार येथील फूल गल्ली मशिदीमधून दारूल उलूम फैजाने मुफ्तिले आझम या संघटनेच्या मदतीने मे 2020 पासून रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो आहे. आजतागायत सुमारे 1000 जणांना ऑक्सिजनचा पुरवठा केल्याचे अब्दूल रझाक मन्सूरी यांनी सांगितलं. सुमारे 15 ते 20 वॉलेण्टिअर्स यासाठी वर्षभर काम करतात. रमजानच्या महिन्यात दुपारी 2 ते संध्याकाळी 6 आणि रात्री 11 ते पहाटे 4 या वेळात हे ऑक्सिजन सिलेंडर देण्यासाठी काम करतात. आधारकार्ड आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर ऑक्सिजनचं सिलेंडर गरजू रुग्णांना देण्यात येत असल्याची माहिती अब्दूल कादीर यांनी दिली. ज्यांना रुग्णालयात बेड मिळत नाही अशा रुग्णांबरोबरच जे रुग्णालयात उपचार घेतात अशा रुग्णांनादेखील इथून ऑक्सिजनचं सिलेंडर देण्यात येतं. “काही रुग्णालयांममधून देखील फोन येतो आणि रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी केली जाते अशी माहिती असिफ मोदी यांनी दिली.”
त्याचबरोबर अब्दूस समद मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना डॉक्टर ऑक्सिजन लावण्याचा सल्ला देतात. मात्र रुग्णांना ऑक्सिजन लावण्यासाठी कोणी नसतं अशा वेळी यांच्यातले प्रशिक्षण दिलेले वॉलेण्टिअर रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णाला ऑक्सिजन लावतात. “रुग्णाच्या नातेवाईकाला ऑक्सिजन कसं लावायचं आणि त्याचा प्रवाह कमी अधिक कशा प्रकारे करायचा याबाबत आमचे वॉलेण्टिअर्स माहिती देतात. कधी गरज पडली तर रुग्णाने फोन केल्यानंतर खिशातले पैसे खर्च करुन सिलेंडर रुग्णाच्या घरी नेऊन देतो,” अशी माहिती सरफराज मन्सूरी यांनी दिली.
ADVERTISEMENT
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऑक्सिजन मागायला येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे हे कोव्हिड योद्धे सांगतात. तसंच, रुग्णासाठी ऑक्सिजन लागेल म्हणून काही रुग्णाचे नातेवाईक घरी ऑक्सिजन सिलेंडरची टाकी नेऊन ठेवतात. अनेकदा त्याने अडचण येते. तसंच खाली सिलेंडर असेल तर त्यात ऑक्सिजन मिळवायला अडचण येत नसल्याचं हे वॉलेण्टिअर्स सांगतात. हे वॉलेण्टिअर्स सर्व सेवा मोफत देतात. ज्यांना वाटतं ते दानशूर व्यक्ती या सेवेसाठी त्यांच्या मनाप्रमाणे डोनेशन देतात.
ADVERTISEMENT
अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत. यासाठी कांदिवलीच्या पाच मजली जैन मंदिरात 100 खाटांचे ऑक्सिजन बेड असलेले कोव्हिड सेंटर तयार करण्यात आले आहे. या मंदिरातले सेवक प्रदिप मेहता सांगतात, “सध्या ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे. यासाठी या पाच मजली इमारतीमध्ये ऑक्सिजन असलेले बेड पुरवण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये हे रुग्णालय सुरू करण्यात येईल.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT