डोंबिवली Gang Rape अल्पवयीन मुलीचा जबाब काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डोंबिवलीची ओळख सांस्कृतिक नगरी, परंपरा जपणारं शहर अशी आहे. अशी ओळख असणारं हे शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरलं आहे. एका पंधरा वर्षांच्या मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. अत्यंत धक्कादायक अशा या घटनेने डोंबिवली हादरली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणात 33 आरोपी आहेत. त्यातल्या 29 जणांन अटक करण्यात आली आहे. जे नवे आरोपी पकडण्यात आले आहेत त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात येते आहे. इतर आरोपींना 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातले दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

हे वाचलं का?

अल्पवयीन मुलीने काय म्हटलं आहे?

‘ आमच्या घरी येणं जाणं असलेला एक मित्र होता. जानेवारी महिन्यात तिला भेटण्यासाठी सकाळी 9.40 च्या सुमारास त्याचा (मुख्य आरोपी) फोन आला. पीडित मुलगी सकाळी 11 च्या सुमारास त्याला भेटायला गेली. तर मुख्य आरोपी ऑटो चालवणाऱ्या त्याच्या मित्रासोबत आला होता. ते एका मैत्रिणीच्या घरी जात होते. वाटेत दुसरा मुलगा त्यांच्यासोबत ऑटोमध्ये बसला.’

ADVERTISEMENT

‘मात्र, मैत्रिणीच्या घरी जाण्याऐवजी पीडितेला वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. मुख्य आरोपीने पीडितेला तिच्या खासगी फोटोंसह ब्लॅकमेल केले, जे तिने पूर्वी (डिसेंबर 2020) त्याच्यासोबत शेअर केले होते. नंतर मुख्य आरोपीने पीडितेवर बलात्कार केला तिसऱ्या आरोपीने व्हीडिओ चित्रित केला. नंतर तिन्ही मुलांनी तिच्यावर बलात्कार केला,’ असं फिर्यादीत लिहिण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

त्यानंतर पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह राहण्यासाठी वेगळ्या ठिकाणी गेली. या दरम्यान मुख्य आरोपी तिला सतत फोन करायचा, पण ती त्याचे कॉल टाळत होती.

20 फेब्रुवारी, 2021 रोजी मुख्य आरोपीने तिला वेगळ्या क्रमांकावरून फोन केला आणि तिला भेटायला सांगितलं पण तिने नकार दिला.

दुसऱ्या दिवशी तो तिच्या घराजवळ गेला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली की, तो तिच्या कुटुंबाला व्हीडिओ दाखवेल आणि सार्वजनिक करेल. यामुळे पीडित तरुणी घाबरली आणि त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली.

मुख्य आरोपी तिला डोंबिवलीतील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे 9 मुलं उपस्थित होती. त्यातील तिघांनी तिच्यावर जानेवारीमध्ये बलात्कार केला होता.

मुख्य आरोपीने तिला गुंगीचे औषध टाकून पाणी दिले. यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेव्हा तिच्या गुप्तांगात वेदना होत होत्या. दरम्यान, तिला दरवेळी अशी धमकी देऊन तिला विविध ठिकाणी नेलं जात होतं.

त्यानंतर 15 मे, 2021 रोजी पीडित तरुणी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हीडिओ शेअर करण्यात आला आणि धमकी देऊन पीडितेला दारू पाजण्यात आली. त्यानंतर तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला. यावेळी फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या 11 मुलांनी तिच्यावर बलात्कार केला.

नंतर 22 सप्टेंबर, 2021 रोजी पुन्हा 5 जणांनी सामूहिक बलात्कार झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर पीडितेने तिच्या पालकांनी या घटनांबाबत माहिती दिली.

Nagpur मध्ये अल्पवयीन बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या

आणखी काय म्हणाली ही पीडिता तिच्या जबाबात?

‘त्या मुलांनी माझा विविस्त्र आणि शारिरीक संबंध असलेला व्हीडिओ शूट केला होता. हा व्हीडिओ व्हायर करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करण्यात आले. मला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं. ज्या मुलाने मला पहिल्यांदा ब्लॅकमेल केलं त्याने माझे व्हीडिओ त्याच्या आणखी काही मित्रांना पाठवले त्यांनी त्यांच्या आणखी मुलांना पाठवले. त्यामुळे आरोपींची संख्या वाढत गेली. पहिल्यांदा हा प्रकार घडला तेव्हा मी सगळ्यांचे नंबर डिलिट केले होते. मी या सगळ्यांना भेटायला नकार दिला. मात्र मला पुन्हा ब्लॅकमेल करण्यात आलं आणि त्यानंतर माझ्यावरचे हे अत्याचारांचं सत्र सुरू आलं. मला थम्सअप सारखं कोल्ड ड्रिंक देण्यात आलं त्यात पावडर टाकण्यात आली होती. त्यानंतर बेशुद्ध करून माझ्यावर बलात्कार करण्यात आला.’

‘तुझ्या घरच्यांना व्हीडिओ दाखवू, तुझे व्हीडिओ व्हायरल करू अशी धमकी देऊन माझ्यावर बलात्कार करण्यात आला.’ विजय फुकेचं नाव या स्टेटमेंटमध्ये अनेकदा घेण्यात आलं आहे. ‘अश्लील व्हीडिओ दाखवून हुक्का ओढण्यासही भाग पाडलं जात असं. फेब्रुवारी, मार्च, मे या महिन्यांमध्ये हे प्रकार घडले आहेत. नवी मुंबईतली काही घरं, डोंबिवलीतल्या काही निर्जन ठिकाणी, पडक्या चाळींमध्ये मला नेण्यात आलं होतं.’ असंही या मुलीने जबाबात म्हटलं आहे.

‘6 मे रोजी जेव्हा तिला नेण्यात आलं तेव्हा माझ्या आईने पोलिसात तक्रार केली होती की माझी मुलगी हरवली आहे. तेव्हा मला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती असंही या मुलीने सांगितलं. ‘मला आरोपी फोन करून वारंवार भेटण्यास सांगत होते. मी नकार दिला की व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. 16 मे रोजी जेव्हा त्यांना भेटायला येणार नकार दिला तेव्हा Friends नावाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर काही व्हीडिओ पोस्ट करण्यात आले’ असंही या मुलीने जबाबात म्हटलं आहे. हे घडल्याने मला पुन्हा एकदा या मुलांना भेटायला जावं लागलं. मला त्रास होऊ लागला तेव्हा मी आईला सांगितलं. पीडितेने आईला हे सगळं सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT